बांगलादेशात हिंदुंवर अत्याचार होत असल्याचा खोटा प्रचार! ढाक्यात येऊन पाहा 'या' नेत्याचे वक्तव्य
नवी दिल्ली - बांगलादेशात हिंदुंवर अत्याचार होत असल्याचे वृत्त अनेक माध्यमांत झळकले आहे. तेथे हिंदू अथवा अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार होत असल्याचे घरं जाळल्याच्या बातम्या आल्या आहेत. या वृत्तांचं खंडन बांग्लादेश नॅशनल पक्ष (बीएनपी) चे सरचिटणीस मिर्झा इस्लाम आलमगीर यांनी केले आहे.
बांगलादेशात जातीय अत्याचार होत असल्याचा अत्यंत दुर्दैवी प्रचार केला जात आहे.बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर हल्ले होत असल्याचे वृत्त सत्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर व्हिडिओही पोस्ट केला आहे.

काय म्हणतात आलमगीर?
बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे सरचिटणीस मिर्झा इस्लाम आलमगीर यांनी आपल्या एक्सवरील व्हिडिओत म्हटले की, "बांगलादेशात जातीय अत्याचार होत आहेत, हा राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आणि विशेषत: तुमच्या (भारत) देशातून विविध माध्यमांद्वारे एक प्रकारचा गैरसमज आणि अत्यंत दुर्दैवी प्रचार केला जात आहे.
अत्याचार होतोय हे अजिबात सत्य नाही
आलमगीर म्हणाले, बांग्लादेशात हे अजिबात सत्य नाही, काही प्रमाणात हे पूर्णपणे राजकीय आहे, मी तुम्हाला ढाका येथे येऊन पाहा, काही लोकांना बांगलादेशचे लोक काही सांप्रदायिक समस्या निर्माण करत आहेत, असे नाही.
#WATCH | General Secretary of the Bangladesh Nationalist Party (BNP), Mirza Islam Alamgir says, "There is a sort of misunderstanding and very unfortunate propaganda being made by different media nationally and globally and especially from your country - the media is peddling that… pic.twitter.com/QjwTiu8Xe2
— ANI (@ANI) August 13, 2024
लोकांना हसीनांचे सरकार नको
आलमगीर म्हणाले, बांगलादेशातील लोकांना यापुढे शेख हसीनाचे सरकार नको आहे ज्याने या काही वर्षांत इतके लोक मारले आणि संविधान नष्ट केले आणि त्यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केले आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला जो अभूतपूर्व होता.
भारतासोबत चांगले संबंध हवेत
भारत-बांग्लादेश संबंधांबद्दल, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे सरचिटणीस मिर्झा इस्लाम आलमगीर म्हणाले, भारत-बांग्लादेश संबंध निश्चितपणे आणखी मजबूत होईल कारण आम्ही एक राजकीय पक्ष म्हणून, भारताला नेहमीच आपला शेजारी आणि मित्र मानतो. भारताने काही मुद्द्यांवर तोडगा काढला पाहिजे यात पाणीवाटप, बीएसएफकडून सीमेवर बांगलादेशी नागरिकांची हत्या थांबवणे आम्ही यासाठी पुढाकार घेतो. आम्हाला भारतासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत.
बांगलादेशात लोकशाही सशक्त करायचीय
मिर्झा इस्लाम आलमगीर म्हणाले, "आपल्या घटनेत त्यांना (अंतरिम सरकार) 90 दिवस दिले जावेत अशी तरतूद आहे. पण विशेष परिस्थितीत, गरज पडल्यास हे वाढवता येऊ शकते. आम्ही नेहमीच स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही 2030 चे व्हिजन दिले आहे त्यासाठी आम्ही भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला उदारमतवादी लोकशाही बांगलादेश आणि समृद्ध बांगलादेश पाहायचा आहे.
शेख हसीनांकडून न्यायव्यवस्थेचे राजकारण
आलमगीर म्हणाले, दुर्दैवाने माजी पंतप्रधानांच्या सरकारने संपूर्ण न्यायव्यवस्थेचे राजकारण केले. त्यांच्या विरोधात आवाज उठला. लोकांकडून, वकिलांमधून आणि नागरी समाजातून तसेच विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे साहजिकच त्यांना काही कटू अनुभव आले. त्यामुळे सरन्यायाधीश आणि इतर न्यायमूर्तींना राजीनामा द्यावा लागला.












Click it and Unblock the Notifications