बांगलादेशात हिंसाचार,105 जणांचा मृत्यू, संचारबंदी लागू
Bangladesh Quota Violence: बांगलादेशातील सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संपूर्ण देशात जमाबवंदीचा कायदा लागू केला आहे. देशभरात लष्कराची तैनात कऱण्यात आले आहे.दुसरीकडे बांगलादेशी मीडियानुसार, शुक्रवारी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शनांवर कारवाई केली, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोलिसांनी काही भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. राजधानी ढाकामध्ये अनेक ठिकाणी छतावरून आगीचे लोट उठताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी धूराचे लोट उठताना दिसत आहे. या आंदोलनामुळे दूरसंचार सेवाही विस्कळीत झाली आहे. अनेक वृत्तवाहिन्याही बंद करण्यात आल्या आहेत.
बंगाली वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलकांनी रस्ते रोखल्याने आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवर दगडफेक केल्यामुळे देशभरात रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. गुरुवारी बांगलादेशातील 64 पैकी 47 जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात 27 जणांचा मृत्यू झाला आणि 1,500 जण जखमी झाले. शुक्रवारी रात्रीच्या निदर्शनांमध्ये एकूण मृतांची संख्या 105 वर पोहोचली आहे. मात्र,पोलिसांनी अद्याप अधिकृत मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही.या निदर्शनादरम्यान, ढाका येथील यूएस दूतावासाने सांगितले की, बांगलादेशात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो जखमी झाल्याचे अहवालात दिसून आले आहे. ढाकामध्ये निदर्शने पसरत आहेत आणि हिंसक चकमकी होत आहेत. परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे.
हिंसाचारात 105 जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात विद्यार्थी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात आतापर्यंत किमान 105 जणांचा मृत्यू झाला आहे. 2,500 हून अधिक जखमी झाले आहेत. शुक्रवारी 17 मृत्यूची नोंद केली तर सोमोय टीव्हीने 30 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टरने ढाका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 23 मृतदेह पाहिले. यापूर्वी गुरुवारी 18 जुलै रोजी 22 जणांचा मृत्यू झाला होता...
या हिंसक आंदोलनात दरम्यान आतापर्यंत एकूण 105 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. व सध्या संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे.
आरक्षणाची व्यवस्था कशी आहे...
बांगलादेशात 1971 च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशासाठी सरकारी नोकरीमध्ये सर्वाधिक आरक्षण 30 टक्के ठेवण्यात आले आहे. देशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये उपलब्ध करून आरक्षण 56% आहे,स्वातंत्र सैनिकांच्या वंशजासाठी 30 टक्के आरक्षणा व्यतिरिक्त महिलांसाठी दहा टक्के, अविकसित जिल्ह्यातील नागरिकांसाठी 10%, आदिवासींसाठी पाच टक्के आणि अपंगासाठी 1% असे आरक्षण आहे.












Click it and Unblock the Notifications