चीनला घेरण्यासाठी भारताचा नवा डाव; भारताच्या ट्रॅपमध्ये कसा अडकणार ' ड्रॅगन '?
India China News : भारत आणि चीनमध्ये जल, जमीन आणि आकाशात सुरू असणारी जीवघेणी स्पर्धा सर्वज्ञात आहे. त्यातच भारताने आता चीनची नाकेबंदी करण्यासाठी नवी योजना आखली आहे. भारताने दक्षिण चीन समुद्र आणि हिंद महासागर क्षेत्र यांना जोडणाऱ्या मलाक्का सामुद्रधुनीच्या प्रवेश बिंदूवर आधारित एक योजना बनवली आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांसाठी एक भव्य योजना तयार केली आहे, जी चीनसाठी डोकेदुखी मानली जाते. काही अब्ज रुपयांचे प्रकल्प या ठिकाणी सुरू होत आहेत. याचा उद्देश या क्षेत्राला एक शिपिंग केंद्र आणि पर्यटन स्थळ बनवणे आहे.
चीनच्या मुजोरीला बसणार जरब:
इंडो-पॅसिफिक समुद्रात चीनच्या वाढत्या वर्चस्वाला खीळ बसवण्याचा भारताचा मानस आहे. यासाठी अंदमान आणि निकोबार परिसरात अनेक लष्करी आणि पर्यटन विषयक प्रकल्प हाती घेत आहे.
हिंद महासागरात सुरक्षा का गरजेची?
मलाक्का सामुद्रधुनी ही हिंदी महासागराचे प्रवेशद्वार आहे. तिथेच भारताने चीनची गळचेपी करण्याची योजना आखली आहे. 1962 च्या युद्धात चीनच्या पाणबुड्या याच भागात अधिक निदर्शनास आल्या होत्या. त्यामुळे या भागात सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे. या भागात एकूण 572 बेटे आहेत. त्यातील 37 बेटांवर लोकवस्ती आहे. अंदमान आणि निकोबार या बेटांच युद्ध आणि व्यापार यादृष्टीने मोठे महत्व आहे. या भागातून जवळपास 60,000 जहाजे वर्षाला ये - जा करत असतात.
भारताची योजना नेमकी काय?
या योजनेबाबत जलमार्ग मंत्रालयाने मांडला आहे. 2021 मध्ये या भागाच्या विकासासाठी 72,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. इथे आंतरराष्ट्रीय बंदर, विमानतळ, एक शहर असे नियोजन आहे. या भागाचा विकास झाल्यावर इथे मोठ्या प्रमाणत भारताचे लष्कर, नोदल पाहायला मिळेल. ज्यामुळे चीनची नाकेबंदी होणार आहे.
दरम्यान या भागात विकास होताना खारफुटी वने, जंगले आणि नैसर्गिक संपदा धोक्यात येणार आहे. त्यामुळे विकास करताना पर्यावरणाचे रक्षण कसे होईल याचा विचार केला जातं आहे.
अंदमान आणि निकोबार बनणार सैन्य छावणी:
यानंतर ही बेटे भारतीय सैन्याची आणि नौदलाची छावणी बनतील. ही बाब चीनच्या घुसखोरीच्या योजनेला धुळीस मिळवेल.
चीनची नाकेबंदी कशी होणार?
भारताचे माजी नौदल प्रमुख याबाबत बोलताना सांगतात की," याबाबत चीनची जहाजे आणि पाणबुड्या यांचा या परिसरात स्त्त वावर असतो. यातून काही धोकादायक शस्त्रांची वाहतूक होते. या बाबींना लगाम बसवला जाईल". भारताला या भागात आपली युद्धक्षमता विकसित करण्याची गरज आहे, असं देखील यावेळी ते म्हणाले.
अंदमान आणि निकोबार या बेटांचे सामरिक महत्व मोठे आहे. विशेष म्हणजे या भागाचे महत्व जपान देश जाणतो. 2022 मध्ये या भागात विजेच्या कामांसाठी जपानने निधी दिला होता. लवकरच या भागातील कामे पूर्ण होणार आहेत. एकंदरीत भारताने ' ड्रॅगन ' ला जाळ्यात पकडण्याचा मोठा प्लॅन बनवला आहे.












Click it and Unblock the Notifications