अमेरिका आणखी 487 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करणार, परराष्ट्र मंत्रालयलाने दिली माहीती
अमेरिकाचे राष्ट्रध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रॅम्प यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेत राहणा-या बेकायदेशीर नागरिकांना मायदेशी पाठवण्याचा एक निर्णय आहे. अमेरिका सरकारने 5 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 104 भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवल्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी 487 भारतीय नागरिकांना हद्दपार करण्याची तयारी केली आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अमेरिकेतून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करण्याच्या गैरवर्तनावर मोठे विधान केले आहे. मिस्री यांनी सांगितले की अमेरिकेने 487 संभाव्य भारतीय नागरिकांना भारतात पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. या व्यक्तींना सुरक्षित आणण्यासाठी ट्रम्प प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की अमेरिकेने परत पाठवलेल्या भारतीय नागरिकांवर होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.

मिस्री यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत निर्बंधांशी संबंधित मानक कार्यपद्धतींबद्दल सांगितले, ज्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारताला दिली आहे. यामध्ये इमिग्रेशन आणि कस्टम्स अंमलबजावणीचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की या प्रक्रिया गेल्या काही काळापासून सुरू आहेत.
#WATCH | Delhi: On the issue of illegal immigrants in the United States, Foreign Secretary Vikram Misri says, "...The process of deportation is not new. it is something that the External Affairs Minister (EAM) also emphasised in the Parliament yesterday...I would not accept the… pic.twitter.com/Vrk07ib7Rt
— ANI (@ANI) February 7, 2025
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नुकत्याच भारतात परतलेल्या भारतीयांवर राज्यसभेत प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. जयशंकर म्हणाले की हद्दपारी ही नवीन समस्या नाही. त्याचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. 5 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने लष्करी विमान सी-17 द्वारे अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 104 भारतीय नागरिकांना भारतात पाठवलं आहे. या भारतीयांनी अमेरिकेने त्यांच्यावर झालेल्या अमानुष वागणुकीच्या वेदनादायक कहाण्या सांगितल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications