रेल्वेच्या वेटिंग लिस्टचा गोंधळ संपणार? प्रत्येकाला मिळणार कन्फर्म तिकीट, जाणून घ्या सविस्तर
दिल्ली: भारतातील बहुतांश लोक कामानिमित्त रेल्वेने प्रवास करत असतात. हा सर्वात सुरक्षित आणि कमी खर्चात होणारा प्रवास मानला जातो. कामानिमित्त अथवा पर्यटन या गोष्टींसाठी लोक रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.परंतु, बऱ्याचदा कन्फर्म तिकीट काही मिळत नाही. त्यामुळे तिकीट मिळणार की नाही अशी धाकधूक शेवटपर्यंत राहते.

पण आता ही कन्फर्म तिकीटाची कटकट संपण्याची शक्यता आहे. तुम्हाला शक्यतो कन्फर्म तिकीट मिळणारच आहे. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज लाखो प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनचा वापर करतात. कमी भाडे आणि देशातील जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात ट्रेनची उपलब्धता यामुळे ट्रेन हा भारतातील वाहतुकीचा सर्वात पसंतीचा मार्ग आहे. मात्र, या प्रवासात सर्वात मोठी अडचण असते ती लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कन्फर्म सीट मिळणे. रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या अनेक प्रवाशांची तिकिटे ही वेटिंग कॅटेगरीतच राहतात.
पण 2032 उजाडणार?
अनेक प्रवाशांना जनरल क्लासच्या डब्यातून प्रवास करावा लागतो. मात्र, आता या समस्येपासून प्रवाशांची सुटका व्हावी. प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट मिळावी यासाठी सरकार गांभीर्याने काम करत आहे. सरकारची तांत्रिक टीम याबाबत कामाला लागली आहे. रेल्वे गाड्या आणि डब्यांची संख्या वाढवणे याबरोबरच तांत्रिक सुधारणा असा हा कार्यक्रम आहे. सरकारने 2032 पर्यंत प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत अलीकडेच माहिती दिली आहे. आरक्षित जागांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत कमी करणे हे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष्य आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी येत्या काही वर्षांत प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च केले जातील असे म्हटले आहे. आगामी काळात रेल्वेच्या ताफ्यात 7 ते 8 हजार नवीन गाड्या समाविष्ट होतील. वेटिंग तिकिटांची समस्या सोडवण्यासाठी रेल्वे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर करणार आहे.
गाड्यांमध्ये कन्फर्म बर्थ देण्यासाठी रेल्वे एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यामुळे टीसी मनमानीपणे वागू शकणार नाही. या एआय मॉड्युलमुळे रेल्वेला तिकिटे कशी बुक केली जातात.मिळालेल्या डेटाच्या मदतीने रेल्वे सुमारे 6 टक्के अधिक कन्फर्म तिकिटे देऊ शकेल असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
त्यामुळे रेल्वेची ही सुरू असणारी प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास आपणास लवकर दिलासा मिळू शकतो. तसेच ए.आय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही प्रक्रिया अधिक जलद होऊ भारतीय प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, परंतु या प्रक्रियेसाठी काही वर्षे लागण्याचा अंदाज आहे.












Click it and Unblock the Notifications