World Student Day 2024: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जागतिक विद्यार्थी दिन संपूर्ण जग साजरा होतो
World Student Day 2024: भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो. डॉ कलाम यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.त्यांचे जीवन खासकरुन तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. विद्यार्थ्यांच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास असल्याने या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. जे विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याची समाजाच्या जबाबदारीची आठवण करून देणारे आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा प्रेरणादायी प्रवास
डॉ. कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव 'अबुल पक्कीर जैनुलाबेदीन अब्दुल कलाम' असे आहे. त्यांचे जीवन म्हणजे एका छोट्याश्या शहरातील एका सामान्य मुलापासून ते प्रसिध्द शास्त्रज्ञ आणि नंतर भारताचे राष्ट्रपती बनण्यापर्यंतच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी आहे. शिक्षण आणि दृढनिश्चयाचे सामर्थ्य दाखवत त्यांनी देशाला संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या उंचीवर नेले. अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी तसेच 1998 च्या पोखरण अणुचाचण्यांमध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. भारताची सुरक्षा मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
कलाम यांचा शिक्षण आणि मूल्यांविषयीचा दृष्टिकोन
डॉ.कलाम यांचे शिक्षणाचे तत्त्वज्ञान केवळ ज्ञान संपादन करण्यापुरते मर्यादित नव्हते. चारित्र्य घडवणे आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देणे हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे. कलाम यांनी म्हटलं होतं की, शिक्षणाचा खरा उद्देश केवळ ज्ञान मिळवणे नाही. ज्ञानाबरोबरच चारित्र्य निर्माण करणे आणि समाजासाठी योगदान आहे. ही कल्पना विद्यार्थ्यांच्या जीवनात उच्च आदर्श आणि मूल्ये प्रस्थापित करण्याचे महत्त्व दर्शवते. जेणेकरून ते केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या इतर क्षेत्रातही यशस्वी होऊ शकतील.
कलाम यांची अपयश आणि यशाची शिकवण
डॉ.कलाम यांनी अपयशाला यशाची पहिली पायरी मानून विद्यार्थ्यांना अपयशाला घाबरू नये अशी प्रेरणा दिली. त्यांचे प्रसिद्ध शब्द आहेत की, तुम्ही अपयशी मिळत असेल तर हार मानू नका. कारण त्याचा अर्थ अपयश म्हणजे शिकण्याचा पहिला प्रयत्न आहे. शेवट हा खरोखर शेवट नाही. याचा अर्थ म्हणजे प्रयत्न कधीच मरत नाहीत. जर तुम्हाला प्रतिसादात नाही मिळाला तर लक्षात ठेवा की, याचा अर्थ पुढील संधी आहे.












Click it and Unblock the Notifications