World Population Day : 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या इतकी होणार, लोकसंख्येत महाराष्ट्राचा कितवा नंबर
World Population Day 2025 : दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो, आणि दर दहा वर्षांनी लोकसंख्येचे मोजमाप केले जाते. २०११ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना लोकसंख्येची गणना करण्यात आली होती. त्यावेळी १२१ कोटींच्या घरात असलेला देशाची लोकसंख्या २०२७ या वर्षात मोजली जाणार आहे.

नियमाप्रमाणे २०२१ मध्ये लोकसंख्येची गणना करणे क्रमप्राप्त होते, परंतु त्या काळात कोरोनाचा संसर्ग एवढ्या शिखरावर होता की, घराबाहेर पडणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे लोकसंख्या गणना झाली नव्हती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नैतृत्वातील एनडीए सरकारने १ मार्च २०२७ पासून लोकसंख्येची मोजली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता या काळापर्यंत भारताची लोकसंख्या किती होणार ही माहिती जाणून घेऊया.
लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात सध्या कितवा क्रमांक आहे
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश भारत हा आहे. भारताच्या पुढे चीन आहे ज्याची लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे.
२०२७ मध्ये किती असेल भारताची लोकसंख्या
भारतात एक मार्च २०२७ पासून लोकसंख्या गणना केली जात आहे. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, या कालावधीपर्यंत भारताची लोकसंख्या १४८ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आता भारताची लोकसंख्या १४१ कोटी असल्याचे म्हटले जाते.
२०३० पर्यंत किती असेल भारताची लोकसंख्या?
इंडिया टीव्हीने संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आपल्या वृत्तात दिला त्यानुसार, २०३० पर्यंत भारताची लोकसंख्या १.५ अब्ज होईल असे म्हटले आहे. म्हणजेच जवळपास १५१ कोटी लोक भारतात असतील, ज्यामुळे तो जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत बनण्याची शक्यता आहे. भारत १.३ अब्जाहून अधिक लोकसंख्येचे घर आहे. भारताची लोकसंख्या सध्या बलस्थान असल्याचे मानले जाते, येथे तरुण लोकसंख्या जास्त असल्याचे मिडिया रपोर्ट्स सांगतात.
कोणते राज्यात सर्वाधिक लोकसंख्या
उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्य हे देशातील असे राज्य आहे, जिथे सर्वात जास्त लोकसंख्या आहे. अलिकडच्या अंदाजानुसार, अंदाजे २३० दशलक्ष लोकसंख्येसह, उत्तर प्रदेश जगभरातील अनेक राष्ट्रांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले आहे.
सन २०११ मध्ये भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती.
२०११ च्या जनगणनेनुसार, भारताची २०११ मध्ये १ अब्ज २१ कोटी ८५ लाख ४ हजार ९७७ एवढी लोकसंख्या होती असे विकिपीडियावर नमूद आहे.
२०११ नुसार, महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती
सरकारच्या २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख ७२ हजार ९७२ होती. महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ९.२८% आहे. लोकसंख्येनुसार, महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटींवर असल्याचे बोलले जाते.












Click it and Unblock the Notifications