Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Big News भारतातील अती गरीबांच्या संख्येत मोठी घट! जागतिक बँकेची आकडेवारी जाहीर, किती आहेत देशात गरीब

World Bank data reveals huge decline in number of extreme poor in India : गरीबी ही जागतिक समस्या असून भारताने गरीबीतून बाहेर पडण्यासाठी गेल्या काही वर्षात केलेल्या प्रयत्नांना आता मोठे यश आल्याचे दिसत आहे. जागतिक बँकेने यासंदर्भात नुकतीच ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, भारताने अत्यंत गरिबीत राहणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्यात उल्लेखनीय यश मिळवल्याचं यातून समोर आले आहे.

World Bank data

काय आहे जागतिक बँकेची ताजी आकडेवारी

२०११-१२ ते २०२२-२३ दरम्यान देशातील २६ कोटी ९० लाख लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आले. जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०११-१२ मध्ये देशातील गरिबीचा दर २७.१ टक्के होता, तर २०२२-२३ मध्ये तो ५.३ टक्क्यांपर्यंत कमी झाला. देशात २०११-१२ मध्ये ३४ कोटी ४४ लाखांहून अधिक लोक अत्यंत गरिबीत राहत होते आणि २०२२-२३ मध्ये त्यांची संख्या झपाट्याने कमी होऊन सुमारे ७ कोटी ५२ लाख झाल्याचं आकडेवारीतून दिसून आले आहे.

Take a Poll

महाराष्ट्रासह तीन राज्यातील ६५ टक्के गरीबी हटली

पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना, जनधन योजना आणि आयुष्मान भारत योजनेच्या मदतीने, गरिबीचा दर कमी करण्यात हे मोठे यश मिळाले आहे. या दिशेने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात विशेष प्रगती नोंदवण्यात आली. २०११-१२ मध्ये, अत्यंत गरिबीत राहणाऱ्या एकूण लोकांपैकी ६५ टक्के लोक या राज्यांमध्ये होते.

जागतिक बँकेची गरीबीची व्याख्या काय?

जागतिक बँकेने गरीबीची विशिष्ट व्याख्या ठरवली आहे. बँकेच्या मते, दररोज तीन अमेरिकन डॉलर्सपेक्षा कमी उत्पन्न असलेले लोक अत्यंत गरिबीत जगत असल्याचे मानले जाते. म्हणजेत भारतीय रुपयांत विचार केल्यास प्रतीदिन 257 रुपयांपेक्षा कमी पैसे कमावणारे लोक अत्यंत गरीबीच्या व्याख्येत येतात.

खेड्याने शहलाला टाकले या गोष्टीत मागे

भारतात, गेल्या काही काळात ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबीची स्थिती लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या काळात, ग्रामीण दारिद्र्याचा दर १८.४ टक्क्यांवरून २.८ टक्क्यांपर्यंत आणि शहरी भागात १०.७ टक्क्यांवरून फक्त १.१ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाच्या बाबतीतही देशात गरिबी कमी झाली आहे. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक २००५-०६ मध्ये ५३.८ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये १५.५ टक्क्यांपर्यंत कमी झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+