अर्थसंकल्पापूर्वी हलवा का बनवतात? लॉक इन म्हणजे काय? वाचा, याविषयीची रंजक माहिती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या काळातला हा दुसरा अर्थसंकल्प असेल. त्याआधी शुक्रवारी निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत हलवा महोत्सव पार पडेल. संसदेत सादर होणाऱ्या प्रत्येक अर्थसंकल्पापूर्वी हलवा बनवला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा हलवा नेमका का बनवला जातो? लाँक इन म्हणजे काय? यामागं नेमके कारण काय? हेच आपण या बातमीत पाहू...

हलवा महोत्सव म्हणजे काय?
जेव्हा अर्थसंकल्पाचे काम पूर्ण होते तेव्हा त्याच्या कागदपत्रांची छपाई करावी लागते. या छपाईपूर्वी यासंबंधीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मंत्रालयाकडून हलवा दिला जातो. मंत्रालयातच बनविलेल्या हलवा वाटप व खाणे झाल्यानंतर अर्थसंकल्पाचे सर्व कागदपत्रे छपाईसाठी जातात. केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून हलवा महोत्सव आयोजित केला जातो. अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही दिवस आधी आयोजित केलेला हा कार्यक्रम, खास हलवा बनवून तो मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्यासाठी प्रसिद्ध आहे.
लॉक इन प्रवेश म्हणजे काय?
या कार्यक्रमानंतर अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी "लॉक-इन" कालावधीत प्रवेश करतात. जिथे त्यांना बाहेरील कोणाशीही संपर्क साधता येत नाही. लॉक-इन हा असा कालावधी असतो ज्यामध्ये बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले प्रत्येकजण बाहेरील जगापासून पूर्णपणे अलिप्त होतात. बजेटबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती लीक होण्यापासून रोखणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. सहसा, बजेट अधिकारी आणि कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या तळघरासारख्या सुरक्षित ठिकाणी राहतात. या काळात, ते सतत बजेटवर काम करतात आणि ते अंतिम करतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेटण्याची किंवा फोन करण्याची परवानगी नसते.
कसा बनवितात हलवा?
मंत्रालयाच्या स्वयंपाकघरात पारंपारिक पद्धतीने हा हलवा तयार केला जातो. त्यात प्रामुख्याने रवा, तूप, साखर आणि सुकामेवा वापरला जातो. ते एका मोठ्या तव्यावर शिजवले जाते. हा हलवा तयार करताना स्वत: अर्थमंत्री स्वतः उपस्थित असतात. अर्थ मंत्रालयाचे स्वयंपाकी हलवा समारंभात हा गोड पदार्थ तयार करतात. ते मंत्रालयातील कर्मचारी, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जातो. अर्थमंत्री स्वतः ते कर्मचाऱ्यांना देतात, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक खास बनतो. ही परंपरा अर्थ मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांच्या कठोर परिश्रमाला दाद देण्याचा एक मार्ग आहे.












Click it and Unblock the Notifications