तेव्हा कसाबने 'त्यांच्या' अंगावर बाँम्ब फेकला होता, आता तेच तेहव्वूर राणावर... कोण आहेत सदानंद दाते?
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनआयए) आणि रॉ टीमने एका खास विमानाने भारतात आणले. त्यासाठी 'ऑपरेशन राणा' राबवले गेले. एनआयए टीमचे नेतृत्व करणारे सदानंद दाते या ऑपरेशनमुळे चांगलेच चर्चेत आले. हे तेच आहेत ज्यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी जिवार उदार होऊन कसाबला पकडले होते.

कोण आहेत सदानंद दाते?
ज्यावेळी दहशतवादी मुंबईत रक्ताची होळी खेळत होते, तेव्हा सदानंद दाते हे मुंबई पोलिसांच्या मध्य प्रदेशाचे अतिरिक्त आयुक्त होते. या चकमकीवेळी सदानंद दाते हेही घटनास्थळी होते. या हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबने सदानंद दाते यांच्या दिशेने ग्रेनेड फेकला होता. तो त्याच्यापासून फक्त तीन फूट अंतरावर पडला. ज्यामुळे त्यांचे सहकारी सब इन्स्पेक्टर प्रकाश मोरे मारले गेले. या घटनेत दाते गंभीर जखमी झाले होते. ग्रेनेडच्या तुकड्यांनी त्यांचे पाय आणि चेहरा घायाळ झाला होता. परंतु धीर न गमावता ते अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्याशी ४० मिनिटे लढत राहिले होते.
आता आली ही जबाबदारी
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सदानंद दाते हे त्या घटनेचे साक्षीदार होते. आता योगायोग म्हणजे, तहव्वुर राणा यांना प्रश्न विचारणारा पहिला व्यक्तीही सदानंद दाते हेच असतील. कामाबद्दलच्या समर्पण आणि धाडसी अधिकारी असल्याने सदानंद दाते आज प्रत्येकासाठी आदर्श ठरले आहेत. १९९० च्या आयपीएस बॅचचे ते अधिकारी आहेत. सदानंद दाते यांनी महाराष्ट्र केडरमध्ये काम केले आहे आणि एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) आणि इतर केंद्रीय संस्थांमध्येही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
सुरुवातीला वर्तमानपत्रे वाटली
सदानंद दाते यांचा जन्म महाराष्ट्रातील एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. बालपण गरिबीत गेले असले तरी ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. सदानंदची आई कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी काम करायची. सदानंद दाते यांनीही लहानपणी वर्तमानपत्रे वाटण्याचे काम केले. निष्ठा, समर्पण आणि कठोर परिश्रमाने ते आयपीएस अधिकारी बनले. सदानंद दाते यांना त्यांच्या शौर्यासाठी 'शौर्य पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
तेहव्वुर राणा कोण आहे?
१२ जानेवारी १९६१ रोजी चिचावतनी पंजाब (पाकिस्तान) येथे जन्मलेले तहव्वुर हुसेन राणा यांनी पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये लष्करी डॉक्टर म्हणून काम केले. नंतर ते कॅनडाचे रहिवासी झाले. राणाने त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडलीसह २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यामध्ये १६६ लोक मारले गेले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली, त्यानंतर त्याला भारतात आणले गेले.












Click it and Unblock the Notifications