Shubhanshu Shukla: '39 वर्षांचा तरुण की 110 वर्षांचा', शुभांशू यांना 'एव्हिल जीनियस' कोणी म्हटले?
Who is Shubhanshu Shukla : 'शुभांशू शुक्ला कदाचित वयाने 39 वर्षांचे तरुण असतील, पण त्याच्याकडे 110 वर्षांच्या व्यक्तीसारखी बुद्धिमत्ता आहे, म्हणूनच त्यांना "wicked smart" म्हटले जाते.
अर्थात हे कोणत्याही माध्यमांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले नाही. तर हिमांशू शुक्ला यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. त्याचे सहकारी त्यांना एक हुशार, मनमिळावू आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा व्यक्ती समजतात.
एनडीटीव्ही यांच्या वृत्तानुसार, ग्रुप कॅप्टन शुक्लाचे मिशन कमांडर डॉ. पेगी व्हिट्सन, जे अमेरिकेचे आहेत, त्यांनी त्यांना 'एव्हिल जीनियस' असे संबोधले आहे. तर संपूर्ण क्रु त्यांच्या असाधारण स्मरणशक्ती आणि शिकण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता याचे कौतुक करतेय.
भारताचे सर्वात तरुण अंतराळवीर असलेले शुभांशू शुक्ला यांनी आज ऐतिहासीक पाऊल टाकले, त्यांनी अंतराळात आज झेप घेतली आहे. त्यांच्याविषयी आज जाणून घेणार आहोत.... 'अॅक्सिओम-4' या मोहीमेसाठी जाणाऱ्या शुभांशू यांच्या आई वडिलांनी काय म्हटलंय, याविषयी देखील जाणून घेऊया.

भारताचे सर्वात तरुण अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Who is Shubhanshu Shukla)
भारताचे सर्वात तरुण अंतराळवीर 'अॅक्सिओम-4' मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण करण्यासाठी सज्ज आहे. यावेळी लखनौसह संपूर्ण देशात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या नावाचे पोस्टर्स लावले आहेत. लोक त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत आहेत.
'आम्हाला आमच्या मुलाच्या ध्येयाबद्दल खूप आनंद'
या खास प्रसंगी, त्याचे वडील शंभू दयाळ शुक्ला म्हणाले की, 'आम्हाला आमच्या मुलाच्या ध्येयाबद्दल खूप आनंद आहे. आमचे आशीर्वाद त्याच्यासोबत आहेत आणि आम्ही देवाला प्रार्थना करतो की त्याचे ध्येय चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावे, तो पूर्णपणे तयार आहे, तो लखनऊ, राज्य आणि आपल्या देशाला अभिमान देत आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे.
'त्रिवेणी नगरचा एक मुलगा इतक्या उंचीवर पोहोचणार'
त्याच वेळी, त्याची आई आशा शुक्लाच्या डोळ्यात अभिमान आणि आनंद पाहायला मिळत आहे. त्या हसत म्हणाल्या की, 'या देशातील, या त्रिवेणी नगरचा एक मुलगा इतक्या उंचीवर पोहोचणार आहे याचा सर्वांना आनंद आहे.
आम्ही त्याला आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठवत आहोत, त्याला आमच्या सुनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तिच्याशिवाय हे शक्य झाले नसते, तिने येथे सर्वात मोठी भूमिका बजावली आहे.'
'शुभांशू एका महिन्यापेक्षा जास्त काळ क्वारंटाईनमध्ये आहेत'
आपण तुम्हाला सांगू इच्छितो की, ऐतिहासिक मोहिमेपूर्वी शुभांशू शुक्ला एका महिन्यापेक्षा जास्त काळ क्वारंटाईनमध्ये होते. त्यांच्या तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. शुभांशू शुक्ला यांनी या ऐतिहासिक उड्डाणासाठी अमेरिकेत जवळजवळ एक वर्ष प्रशिक्षण घेतले आहे.
'मी अब्जावधी हृदयांच्या आशा आणि स्वप्ने देखील घेऊन जातोय'
शुभांशू शुक्ला म्हणाले की 'उत्साह खूप जास्त आहे, मी आयएसएसवर 14 दिवस घालवण्याची तयारी करत आहे, मी केवळ उपकरणेच नाही तर अब्जावधी हृदयांच्या आशा आणि स्वप्ने देखील माझ्यासोबत घेऊन जात आहे.
हा माझ्यासाठी एक लांब प्रवास होता, मी म्हणेन की मी खूप भाग्यवान आहे की, मला माझ्या आयुष्यात प्रथम उड्डाण करण्याची संधी मिळाली, जी माझ्यासाठी स्वप्नवत नोकरी होती, नंतर अंतराळवीर कॉर्प्ससाठी अर्ज करण्याची संधी मिळाली आणि आता मी अंतराळ मोहिमेवर जात आहे.
#WATCH | Delhi: On #AxiomMission4 all set to launch today, Space Strategist PK Ghosh says, "...For us, this is a very important day because very soon we are going to have the Gaganyaan coming up...At that time, he (Group Captain Shubhanshu Shukla) will be the only person who will… pic.twitter.com/A0ZHP2RuaK
— ANI (@ANI) June 25, 2025
शुभांशू शुक्ला, देशाचे दुसरे अंतराळवीर
विशेष बाब म्हणजे, शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे देशातील दुसरे अंतराळवीर असतील, 1984 मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांनी इतिहास रचल्यानंतर जवळजवळ चार दशके झाली. भारत-अमेरिका अॅक्सिओम-4 मोहीम ही रशियासोबत नाही तर अमेरिकेसोबतची भागीदारी आहे.
'मी माझ्या हृदयाच्या तळापासून नासाला सलाम करू इच्छितो'
'अॅक्सिओममिशन-4' वर, अंतराळ रणनीतिकार पीके घोष म्हणाले की, हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण लवकरच आपल्याकडे गगनयान होणार आहे, त्यावेळी तो (ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला) एकमेव व्यक्ती असेल जो अनुभवी असेल आणि तो निश्चितपणे गगनयान मोहिमेचे नेतृत्व करेल, मी याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि इतक्या चांगल्या अंतराळवीराची निवड केल्याबद्दल मी नासाला सलाम करू इच्छितो.
देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस
'मला वाटते की हा भारत, इस्रो आणि देशातील प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण आपण 1984 नंतर दुसऱ्यांदा अंतराळवीर पाठवत आहोत.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला 14 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार आहेत, 14 दिवसांचा पूर्ण अनुभव घेतल्यानंतर ते परत येतील, मला वाटते की सर्व 1.4 अब्ज लोक याची वाट पाहत आहेत.












Click it and Unblock the Notifications