Budget 2025 : राष्ट्रपतींच्या भाषणातील ८ महत्त्वाचे मुद्दे; काय म्हणाल्या? वाचा एका क्लिकमध्ये
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दोन्ही सभागृहांना संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आजच्या भाषणात सरकारच्या कामगिरीबाबत काय सांगितलं. काय होते त्यांचे महत्त्वाचे मुद्दे हे आपण समजून घेऊयात...

महाकुंभावर व्यक्त केला शोक
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सुरुवातीला संविधान निर्मात्याला नमन केलं. त्यानंतर त्यांनी प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात घडलेल्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
शेतकरी हिताचे निर्णय
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सांगितले की, आत्तापर्यंत या सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. हे सरकार गरीब व तरुणांसाठी काम करत आहे. केंद्र सरकारने रेल्वे बाबत केलेल्या प्रगतीचा उल्लेखही राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आजच्या भाषणात केला.
एक देश एक निवडणूक
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू म्हणाल्या, भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. सरकार त्या दृष्टीनेच काम करत आहे. देश सध्या वेगाने प्रगती करत आहे. एक देश एक निवडणूक याबाबतही सरकार काम करत आहे.
नारी शक्तीचा केला उल्लेख
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात महिलांचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, सबका साथ, सबका विकास या मंत्रानुसार हे सरकार काम करत आहे. गरीब व महिलांसाठी सरकारने विशेष पावले उचलली आहेत. आयुष्यमान भारत योजनेतून सरकारने सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा दिला आहे. महिलांसाठी हे सरकार अतिशय काटेकोरपणे काम करत आहे.
खेळाडूंचाही केला गौरव
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात ऑलंपिकमध्ये देशाला पदके मिळवून देणाऱ्या मुलींचाही गौरव केला. त्या म्हणाल्या, भारताच्या मुली या देशात ऑलंपिकमध्ये पदके मिळवून देत आहेत. देशातील तरुण आता खेळाकडेही वळाले आहेत. सरकारने खेळाडूंकडे विशेष लक्ष दिल्यानेच हे शक्य होत आहे. तरुणांच्या हाताला काम देण्याबाबतही सरकार आग्रही दिसत आहे.
मध्यवर्गीयांना केले खूश
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू म्हणाल्या, या सरकारने नुकताच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. युनिफाईड पेन्शन अंतर्गत ५० टक्के पेन्शन देण्याच निर्णय घेतलाय. रेरा कायदा, मध्यवर्गीयांसाठी हक्काचे घर, अशा सर्वच क्षेत्रात सरकारने चांगले काम सुरु ठेवले आहे.
गरीबांना केले सक्षम
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू म्हणाल्या, हे सरकार निर्णयांची वेगाने अंमलबजावणी करताना दिसत आहे. त्याचा फायदा देशातील गरीब, महिला व वंचितांना मिळत आहे. सरकारने तीन कोटी गरीबांना घरे दिली. पीएम स्वामित्व योजनेतून दोन कोटींहून अधिक ओनरशिप कार्ड दिली गेली. पीएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना यातून सरकारने गरिबांकडेही लक्ष दिले.
एआय क्षेत्रात प्रगती
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू म्हणाल्या, भारतात एआय मिशन सुरु आहे. या तंत्रज्ञानातून भारत जगाला रस्ता दाखवत आहे. काश्मीरपासून थेट कन्याकुमारीपर्यंत कनेक्टीव्हिटी सुरु झाली आहे. काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच पूल बांधला गेला आहे. भारत सध्या वेगाने प्रगती करत असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रपतींनी केला.
स्टार्टअप इंडियाचा उल्लेख
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी भाषणातून सरकारच्या विशेष योजनांचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, आपले तरुण स्टार्टअप पासून अंतरालापर्यंत देशाला गौरवशाली बनवत आहेत. गेल्या दशकात मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅन्डअप इंडिया या योजनांतून लाखो तरुणांनी स्वतःला व देशाला वैभव प्राप्त करुन दिले.












Click it and Unblock the Notifications