उपराष्ट्रपती निवडणूक: मतमोजणी सुरु, कोण जिंकणार, सीपी राधाकृष्णन की रेड्डी? थोड्याच वेळात निकाल
Vice President Election Results Update : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज 9 सप्टेंबर 2025, (मंगळवारी मतदान पार पडले. सकाळी दहावाजेपासून सुरु झालेली मतदार प्रक्रीया सायंकाळी पाच वाजता पुर्ण झाली.
राज्यसभेचे 245 आणि लोकसभेचे 543 असे एकूण 788 खासदार या निवडणुकीत मतदाते होते. सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झालेल्या मतदानाची प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षेनेते राहुल गांधी आणि जवळपास सर्व खासदारांनी सहभाग घेतला. मतमोजणीला सायंकाळी पाचनंतर सुरुवात झाली असून भारताला आपला पुढील उपराष्ट्रपती थोड्याच वेळात मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींनी सर्वात आधी केले मतदान, चुरशीची लढत
उपराष्ट्रपती पदासाठी आजची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी 'INDIA' आघाडी यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी मतदान केले. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात चुरशीची लढत झाली.
एवढ्या खासदारांनी बजावला मतदानाचा हक्क
संसद भवनातील रूम नंबर 101 मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 788 खासदारांपैकी 7 जागा रिक्त आहेत, म्हणून सध्या 7181 असा एकूण खासदारांचा आकडा आहे, यातील 768 खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर 13 खासदारांनी मतदान केले नाही. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता मतमोजणी लवकरच सुरू होईल आणि थोड्याच वेळात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच पहिल्याच सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल, जितेंद्र सिंह आणि एल मुरुगन यांच्यासोबत सर्वात आधी मतदान केले. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संसद भवनात आपला मतदानाचा हक्क बजावला.
कुणाची ताकद मोठी, किती जागा आणि संख्याबळ
संसद भवनात एकूण 781 खासदार आहेत (542 लोकसभा आणि 239 राज्यसभा) यामध्ये एनडीए आघाडीला 427 खासदारांचा पाठिंबा असून, विजयासाठी आवश्यक असलेल्या 391 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा हे संख्याबळ खूप जास्त आहे. तर, 'इंडिया' आघाडीकडे 315 खासदार आहेत. बीजू जनता दल (BJD) आणि भारत राष्ट्र समिती (BRS) यांसारख्या काही प्रमुख पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो.
निवडणुकीवर काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मतदानापुर्वी म्हटले की, बीजेडी, बीआरएस आणि अकाली दलाने निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे 'इंडिया' आघाडीची मते कायम राहतील आणि ही लढत अधिक लक्षवेधी होईल.
कोण भाजपसोबत, कोण संविधानासोबत - काँग्रेस खासदार
काँग्रेसचे खासदार माणिकम् टागोर यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा सक्तीने घेतल्यासारखा वाटत असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, 'इंडिया' आघाडीने प्रामाणिक आणि तटस्थ म्हणून ओळखले जाणारे न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली, जेणेकरून कोण भाजपसोबत आहे आणि कोण संविधानासोबत आहे, याची परीक्षा घेता येईल.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications