कावड यात्रेच्या वादात रामदेव बाबांची एन्ट्री, जाणून घ्या काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात प्रसिद्ध अशा कावड यात्रेला सुरुवात झाली आहे उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ सरकारने कावड यात्रेसंबंधित आता नवा नियम जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार कावड यात्रेच्या मार्गावरील प्रत्येक खाद्यपदार्थाच्या दुकानाच्या किंवा हातगाडीच्या मालकाला आपले नाव फलकावर लिहावे लागणार आहे, जेणेकरून या यात्रे दरम्यान कोणताही नवा वाद निर्माण होऊ नये.
यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये आणि त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होऊ नयेत शिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही सूचना देण्यात आली आहे.

यूपीनंतर उत्तराखंड सरकारनेचाही निर्णय
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 240 किलोमीटरच्या कंवर यात्रा मार्गावरील सर्व हॉटेल्स, ढाबे आणि स्टॉल्सना त्यांच्या मालकांची किंवा या दुकानांवर काम करणाऱ्यांची नावे दाखविण्याचा आदेश दिल्यानंतर, उत्तर प्रदेश सरकारने शुक्रवारी संपूर्ण राज्यासाठी असाच आदेश जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता या आदेशानंतर विरोधक पक्षाकडून सडकून टीका केली जात आहे.
हा निर्णय संविधानाचे उल्लंघन करतो..
जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी म्हणाले की हा 'भेदभाव करणारा आणि सांप्रदायिक' निर्णय आहे आणि तो संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो. त्यांची कायदेशीर टीम या आदेशाच्या कायदेशीर बाबींचा विचार करेल असेही ते म्हणाले. तसेच देशातील सर्व नागरिकांना हवे ते परिधान करायचे हवे ते खाण्याचे पूर्ण स्वतंत्र्य घटनेत देण्यात आले आहे त्यांच्या वैयक्तिक निवडीवर कोणीही अडथळा आणणार नाही कारण हे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत,असेही मदनी म्हणाले.
नेमप्लेटच्या वादात योगगुरू बाबा रामदेव यांनीही उडी घेतली आहे. माझी ओळख उघड करण्यात मला काही अडचण नाही, तर इतर कोणाला कशी काय असू शकते, असा सवाल रामदेव बाबांनी केला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने रेस्टॉरंट मालकांना कंवर यात्रा मार्गावर नावे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचनेवरून वाद सुरू झाला आहे
प्रख्यात मुस्लिम संघटना जमियत उलेमा-ए-हिंदने त्याला 'भेदभावपूर्ण आणि सांप्रदायिक' म्हटले आहे, तर भारतीय जनता पक्षाचे नेते इतर राज्यांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, रामदेव बाबांनीही या वादात आणखी एक पाऊल टाकले आहे.
मग रहमानला ओळख उघड करण्यात अडचण का आहे?
कंवर यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या नावाच्या फलकांवर योगगुरू बाबा रामदेव म्हणतात, "जर रामदेव यांना त्यांची ओळख उघड करण्यात काही अडचण नाही, तर रेहमान यांना त्यांची ओळख उघड करण्यात काही अडचण का आहे? प्रत्येकाने स्वतःचा अभिमान बाळगू नये. नाव, फक्त आपल्या कामात शुद्धता हवी, कोणी हिंदू असो, मुस्लीम असो किंवा इतर कोणत्याही समाजाचा असो.
पावित्र्य जपण्यासाठी निर्णय
उत्तर प्रदेशमध्ये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार खाद्यपदार्थाचे प्रत्येक दुकान तसेच हातगाड्यांवर मालगाचे नाव सांगणारा बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कावड यात्रेत सहभागी झालेल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. या शासन निर्णयानंतर उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक रेस्टॉरंट, भोजनालय, रस्त्याच्या बाजूचे ढाबे, फूड स्टॉल अशा प्रत्येकांनाच मालकाच्या नावाचा बोर्ड लावला जाणार आहे.
बिहारमध्येही नाम फलक मागणी
उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर आता उत्तर भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. बिहारमध्येही कावड मार्गावरील भोजनालयांवर मालकाचे नाव लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. भाजपाचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी तशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे यात्रेकरू भोजनालयात नाव पाहू शकतील. त्यामुळे यात्रेकरूंना वाटले तर ते संबंधित दुकानात जातील. या निर्णयामुळे भोजनालयात जाऊन नाव विचारल्यामुळे होणारे वाद टाळता येतील, असा तर्क हरिभूषण ठाकूर यांनी मांडला आहे.
मध्यप्रदेशमध्येही मागणी
हरियाणानंतर आता मध्य प्रदेशमध्येही अशीच मागणी केली जात आहे. येथील भाजपाचे आमदार रमेश मेंदोला यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे तशी मागणी केली आहे. कोणत्या व्यक्तीचे नाव ही त्याची ओळख असते. प्रत्येक लहान मोठे व्यापारी आणि दुकानदाराने दुकानासमोर आपले नाव लिहिणे बंधनकारक करावे, असे मेंदोलना म्हणाले आहेत.
त्यामुळे एकंदरीतच उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात विरोधकांकडून टीका केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications