Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पोर्ट ब्लेअरचे नाव बदलं, आता 'श्री विजया पुरम ' नावाने ओळखलं जाणार

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकाराने मोठा निर्णय घेतला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नामकरण श्री विजया पुरम असं करण्यात आलं आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी घोषणा केली आहे. अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले 'श्री विजयपुरम' हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते, असं त्यांनी म्हटलं आहे.

amit shah

केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि इतिहासात या बेटाचे वेगळे स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढ्यापर्यंतचे ठिकाणही हे बेट आहे.

याआधी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये शौर्य दिनानिमित्त पीएम मोदींनी 21 अज्ञात बेटांना परमवीर चक्र विजेत्यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही पंतप्रधान मोदींनी अनावरण केले. केंद्र सरकारने निकोबार बेटावर 72000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मंजुरी दिली आहे.केंद्र सरकारने नाव का बदलले?

पोर्ट ब्लेअरचे मूळ नाव ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटिश वसाहती नौदल अधिकारी कॅप्टन आर्चीबाल्ड ब्लेअर यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देणाऱ्यांसाठी हे शहर पहिले डेस्टिनेशन पॉईंट आहे. केंद्र सरकारचा नाव बदलण्याचा निर्णय हा भारतातून वसाहतवादी ठसे काढून टाकण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरित झालेल्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे.

मोदी सरकारने यापुर्वी ही घेतले आहेत असे निर्णय

- जुलैमध्ये राष्ट्रपती भवनाच्या 'दरबार हॉल' आणि 'अशोका हॉल'चे बदलून 'गणतंत्र मंडप' आणि 'अशोक मंडप' असे नामकरण करण्यात आले.

- वसाहतवादी वारसा नष्ट करण्याच्या उद्देशाने संरक्षण दलातही बदल करण्यात आले आहेत. केंद्राने भारतीय नौदलातील सर्व कर्मचाऱ्यांची लाठी वाहून नेण्याची प्रथा तात्काळ संपुष्टात आणली. याव्यतिरिक्त भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजीच्या शिक्काने प्रेरित असलेले त्यांचे चिन्ह अपडेट केले.

- पोर्ट ब्लेअरचे श्री विजयपुरम असे नामकरण हे या दिशेने आणखी एक पाऊल आहे, ज्याचा उद्देश भारताच्या समृद्ध इतिहासाचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा सन्मान करणे आहे..

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+