Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताचा पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा दणका! बगलिहार धरणातून चिनाब नदीचे पाणी थांबवले, पाकमध्ये खळबळ!

Pahalgam attack India stops Chenab river water : जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला अन् पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली.

या सर्व परिस्थितीनंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने आज रविवारी (दि.4 मे) सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह भारताने रोखला आहे.

त्यामुळे पाकिस्तानात आता पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार हे निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे, झेलम नदीवरील किशनगंगा धरणातून पाकिस्तानकडे जाणारे पाणी देखील रोखण्याची तयारी भारताने सुरू केली आहे.

India stops Chenab river water

विशेष सुत्रांकडून पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारत जम्मूतील रामबनमधील बागलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणातून आपल्या बाजूने पाणी सोडण्याच्या वेळेचे नियमन करू शकतो. याचा अर्थ असा आहे की, या धरणांमधून पाकिस्तानला पोहोचणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद करता येणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारच्या वतीने हे पाऊल उचलण्यास सुरुवात केलेली आहे.

पाकिस्तानसाठी ते का महत्त्वाचे आहे?

सिंधू जल कराराअंतर्गत, पाकिस्तानला सिंधू जल प्रणालीअंतर्गत पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, चिनाब आणि झेलम) नियंत्रण देण्यात आले आहे. पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीतील सुमारे 93% पाणी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरतो. पाकिस्तानातील सुमारे 80 टक्के शेती जमीन त्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका महत्त्वाची आहे. हेच कारण आहे की करार पुढे ढकलल्यानंतर पाकिस्तान सतत युद्धाच्या धमक्या देत आहे.

पाणी करार स्थगिती केल्यानंतर पाकिस्तानी नेते बरळले!

करार पुढे ढकलल्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले होते की, 'एकतर आमचे पाणी सिंधू नदीत वाहेल, किंवा त्यांचे रक्त वाहेल.' या विधानावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. एवढेच नाही तर, पाकिस्तानी राजकारण्यांनी करार पुढे ढकलण्याच्या निर्णयाला थेट युद्धाची घोषणा मानले. पाकिस्तानसाठी सिंधू नदीचे खूप महत्त्व आहे आणि करार स्थगित झाल्यानंतर त्यांच्या नेत्यांमध्ये असलेली घबराट ही त्याची प्रचिती मानली जात आहे.

लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 3 सैनिक ठार

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात रविवारी लष्कराचे एक वाहन 600 मीटर खोल दरीत कोसळले. या अपघातात 3 सैनिक शहीद झाले आहेत. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत सैनिकांची नावे आहेत.

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे वाहन जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या ताफ्याचा भाग होते. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग 44 वर चालकाचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे वाहन खड्ड्यात पडले. लष्कर, पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य करत आहेत.

ढगफुटीमुळे रामबनमध्ये मोठे नुकसान!

शुक्रवारी रामबनमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर चिखल साचल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग-44 दोन्ही बाजूंनी बंद होता. महामार्ग मोकळा असल्याची माहिती मिळाल्यानंतरच प्रशासनाने लोकांना प्रवास करण्याचा इशारा दिला होता. यापूर्वी, 4 जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचा ट्रक खड्ड्यात कोसळल्याने चार सैनिकांचा मृत्यू झाला होता. दोन सैनिक गंभीर जखमी झाले. ट्रकमध्ये फक्त 6 सैनिक होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात जिल्ह्यातील एसके पायीन भागात झाला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+