Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हल्ला मुंबईत, मग तहव्वूर राणाला दिल्लीच्या तुरुंगात का ठेवणार? चौकशी कोण करणार? ही 3 कारणं आली समोर

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वुर राणाला विशेष विमानाने भारतात आणले जात आहे. त्याला दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात येईल. त्याच्या अटकेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. आता प्रश्न असा आहे की तहव्वूरने हल्ला मुंबईत केला असेल तर त्याला दिल्लीत का आणले जात आहे? या प्रश्नानंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Tahawwur Rana update

कोण आहे तहव्वुर राणा?

मुंबईतील ताज हाॅटेलवर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट डेव्हिड कोलमन व तहव्वुर राणा यांनी आखला होता. अमेरिकेत मुंबई हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी केल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले होते. राणाला हल्ल्यांत थेट मदत केल्याबद्दल दोषी आढळला नसला तरी, इतर आरोपांसाठी तो दोषी आहे. तहव्वूर राणाला चौकशीसाठी भारतात आणले तर पाकिस्तानचे भारताविरोधी कारवायांचे मोठे पुरावे हाती लागतील, असे सांगितले जात आहे.

तहव्वूरला तिहारमध्ये का ठेवले?

तहव्वुर राणाला दिल्लीत आणण्याचे सर्वात मोठे कारण एनआयए आहे. हे प्रकरण एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेच्या अखत्यारीत आहे. एनआयएचे मुख्यालय दिल्लीत असल्याने त्याला दिल्लीत ठेवण्यात आले आहे. एनआयएने २०११ मध्ये तहव्वुर राणा आणि इतर आरोपींविरुद्ध दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यामुळे हा खटला दिल्लीतील एनआयए विशेष न्यायालयात चालविला जाण्याची शक्यता वाढली आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि पुरावे दिल्लीत असल्याने त्याला येथील जेलमध्येच ठेवल्याचे सांगितले जात आहे.

तहव्वूर मुंबईत येईल का?

एनआयएनेच्या आरोपपत्रात तहव्वुर राणाला आरोपी आहे. मुंबई पोलिसांच्या मूळ आरोपपत्रात त्याचे नाव वॉन्टेड आहे. तेहव्वुर राणाची दिल्लीत दोन-तीन महिने चौकशी केल्यानंतर कदाचित त्याला मुंबईत पाठवविले जाईल. सध्या तहव्वुर राणाला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिस नव्हे तर एनआयए प्रथम अमेरिकेत गेले होते, त्यामुळे राणाला पहिल्यांदा दिल्ली जेलमध्ये ठेवले जाईल, असेही सांगितले जात आहे. याशिवाय सुरक्षा आणि प्रशासकीय कारणे देखील आहेत. तिहार तुरुंगात उच्च सुरक्षा व्यवस्था आहे. म्हणूनच दहशतवादी राणाला आधी दिल्लीत आणले जात आहे.

चौकशी पथकात कोण आहे?

तहव्वुर राणाकडून सत्य काढण्यासाठी एनआयएने एक टीम तयार केली आहे. यामध्ये, दोन महानिरीक्षक (आयजी), एक उपमहानिरीक्षक (डीआयजी) आणि एक पोलीस अधीक्षक (एसपी) यांचे पथक तेहव्वुर राणा यांची चौकशी करेल आणि पुढील कारवाई करेल. या हायप्रोफाइल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, एनआयए अधिकाऱ्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी दिल्ली पोलिसांची स्वाट टीम तैनात केली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+