कसाबसारखी तहव्वूर राणाला बिर्याणी खायला देऊ नका; सोशल मीडियावर लोक असे का म्हणत आहेत...
Tahawwur Rana : मुंबईवरील 26/11 2008 च्या दहशतवादी हल्ला भारतामध्ये झालेला आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यात पोलिस आणि जवानही शहीद झाले. समस्त मुंबईकरांचे आणि देशवासीयांचे हृदय चिरणारा हा हल्ला आहे. या हल्ल्याच्या जखमा आजही लोकांच्या हृदयात आहेत. आता पुन्हा एकदा त्याच जखमा ताज्या झाल्या आहेत,याला कारण म्हणजे या हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला भारतात आणले जात आहे.
ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र झाल्या आहेत. युजर्स आता आपापली मतं व्यक्त करत आहेत. अजमल कसाबला ज्या सोई सुविधा दिल्या त्या राणाला देऊ नये.अजमल कसाबला तुरुंगात 'बिर्याणी' दिली जात असून त्याच्या सर्व सुखसोयींची काळजी घेतली जात असल्याची अफवा पसरली होती. या गोष्टींबाबत लोकांचा रोष स्पष्टपणे दिसत होता. लोक म्हणतात की दहशतवाद्यांबद्दल कठोरता असली पाहिजे आणि उदारता नको. जे नेहमीचे अन्न आहे तेच द्यावे, चोचले पुरवू नये.

कसाबला खरोखर बिर्याणी मिळाली होती का?
अजमल कसाबला तुरुंगात बिर्याणी दिली जात होती का..यासंदर्भात ठोस माहिती लोकांपर्यंत आहेच असे नाही, बहुदा अनेकवेळा काही अफवाही पसरल्या होत्या..त्याला ज्या सुविधा मिळत होत्या, त्यापेक्षा जास्त गोष्टी चवीने सांगितल्या गेल्या आहेत असेही म्हटले जाते.
हल्ल्यावेळी अनेकांचे प्राण वाचवणारा व्यक्ती काय म्हणतोय?
एका चहा विक्रेत्याने मुंबई हल्ल्यावेळी अनेकजणांचे प्राण वाचवले होते. आता राणाला भारताने ताब्यात घेतल्यानंतर तो व्यक्त झाला आहे. कसाबसारख्या दहशतवाद्याला कोणतीही विशेष सुविधा मिळू नये, मग ती सुरक्षा असो वा अन्न. कसाबसारख्या दहशतवाद्यालाही विशेष वागणूक मिळायला नको होती, असे त्यांचे म्हणणे आहे.
कसाब, बिर्याणी आणि उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रीया
कसाबला सरकारकडून बिर्याणी खायला दिली होती का? असा प्रश्न मुंबई हल्ला प्रकरणातील सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आला. यावर निकम म्हणाले, "सगळा किस्सा लोकांना माहिती आहे, पण असे तुम्हाला वाटते का? की फक्त राजकारण्यांनीच 'ये राजकीय जुमला था' असे म्हणायचे. आम्हीही वकील आहोत. काही वेळेला जुमले करावे लागतात, तर काही वेळेला नॅरेटीव्ह सेट करावे लागते. याला एक विशिष्ट उद्देश आहे.
काय म्हणतात माजी आयपीएस अधिकारी मिरा बोरवणकर
अजमल कसाब या दहशतवाद्याला तुरुंगात मटण, बिर्याणी मिळत होती अशा चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. मात्र, हा दावा आता माजी आयपीएस अधिकारी मीरा चढ्ढा बोरवणकर यांनी फेटाळून लावला आहे. महाराष्ट्राच्या तुरुंग विभागात अतिरिक्त डीजी तेव्हा त्या होत्या आणि त्यांनी कसाबच्या फाशीवर स्वतः लक्ष ठेवले होते. त्यांनी आपल्या 'मॅडम कमिशनर: द एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ ऑफ ॲन इंडियन पोलिस चीफ' या पुस्तकात सांगितले की, कसाबला तुरुंगात कधीही विशेष जेवण दिले गेले नाही.












Click it and Unblock the Notifications