सावरकर : सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले अन् दिला थेट इशारा! काय होती ती टीका, जाणून घ्या!

Supreme Court on Rahul Gandhi Over Swatantryaveer Savarkar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावर सर्वोच्च न्यायालयाने कॉंग्रेस नेते राहुल गांधींना यांना चांगलंच फटकारलं आहे. राहुल गांधी यांच्या विधानाला न्यायालयाने 'बेजबाबदार' पणाचे लक्षण असे म्हटले. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध केलेल्या टीकेबद्दल राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राहुल गांधी यांचा समाचार घेतला. चला तर संपूर्ण प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊया..!

Supreme Court

त्यांनी स्वातंत्र्य दिले अन् तुम्ही त्यांच्याविषयी असं बोलता

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती यांनी राहुल गांधी यांना फटाकरले. ते म्हणाले की, त्यांनी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून काम केले अन् तुम्ही त्यांच्याविषयी असे वागता, बोलता.

यापुढे सावरकरांविरोधात कोणतेही वादग्रस्त व विधान करू नये, असा इशारा देखील न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला. सावरकर महाराष्ट्रात पूज्यनीय आहेत. यापुढे जर तुम्ही त्यांच्याविरोधात टीका केली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

सर्वोच्च न्यायालयाचे नेमकं काय म्हटले?

सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्देशात म्हटले की, न्यायालय कोणालाही स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध वादग्रस्त विधाने करू देणार नाही. यावेळी सावरकर आहेत, पुढच्या वेळी कोणी म्हणेल की महात्मा गांधी इंग्रजांचे सेवक होते.
आगामी काळात जर अशी विधाने केली तर आम्ही या प्रकरणात दखल घेऊ. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

4 एप्रिलला HCत झाली होती सुनावणी

4 एप्रिल रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडून झटका मिळाला होता. राहुल गांधींविरुद्धचा समन्स आदेश रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. न्यायालयात प्रलंबित असलेल्या सावरकर मानहानी खटल्यात राहुल गांधींना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने स्पष्टपणे नकार दिला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

  • राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला २०२२ मध्ये दाखल झाला. भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात दाखल झाली होती, तेव्हा राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहे.
  • ज्यामध्ये राहुल गांधींनी सावरकरांना 'ब्रिटिशांचे सेवक' म्हटले होते. असेही म्हटले जात होते की सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत असत. या प्रकरणाबाबत वकील नृपेंद्र पांडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
  • राहुल गांधी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 153 (A) आणि 505 अंतर्गत प्रथमदर्शनी खटला विचारात घेऊन ट्रायल कोर्टाने त्यांना समन्स बजावले होते.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+