थंडीत फ्रिज 'बंद' करणे ही मोठी बचत की गंभीर चूक! थांबा! तज्ज्ञ काय सांगतात वाचा!
Should You Switch Off Fridge in Winter : हिवाळ्यात थंडीचा कडाका सुरू होतो, तसाच एक प्रश्न अनेक घरांमध्ये डोकावतो: थंडीमध्ये फ्रिज बंद करायचा का? थंड पाण्याची गरज कमी होते, आईस्क्रीम किंवा गोठवलेल्या खाद्यपदार्थांचा वापर घटतो आणि अनेकांना वाटते की फ्रिज बंद करून वीज वाचेल आणि मशीनचे आयुष्यही वाढेल, अनेकजण हा फंडाही वापरतात, पण तसे करणे योग्य की अयोग्य हे मात्र अनेकांना माहित नाही.

थंडीत किंवा गरज नसताना आणि बाहेरगावी जायचे असेल तर फ्रिज बंद केले जाते, पण असे करणे आणि हिवाळ्यात फ्रिज बंद ठेवावे, ही कल्पना पूर्णपणे गैरसमजाची आहे आणि यामुळे तुमच्या फ्रिजचे मोठे नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. काय सांगतात तज्ज्ञ हे जाणून घेऊया.
फ्रिज बंद करण्याचा विचार का येतो?
फ्रिज हे घरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपैकी एक आहे. ते अन्न खराब होण्यापासून वाचवते, भाज्या दीर्घकाळ ताज्या ठेवते आणि थंड पाणी पुरवते. थंडीत या गरजांमध्ये थोडी घट होते, त्यामुळे अनेक लोक फ्रिज आठवडे किंवा महिने बंद ठेवण्याचा विचार करतात. पण, वस्तुस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे.
थंडीत फ्रिज बंद करणे का आहे अयोग्य?
- फ्रिजचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा काॅम्प्रेसर होय. काॅम्प्रेसर फ्रिजमध्ये कूलिंग टिकवून ठेवतो आणि संपूर्ण प्रणाली चालवतो.
- जर फ्रिज दीर्घकाळ बंद ठेवला, तर सर्वात आधी कंप्रेसरच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
- अनेक प्रकरणांमध्ये, रेफ्रिजरंट गॅस लीक होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे दुरुस्तीचा खर्च खूप महाग असू शकतो.
- वीज वाचवण्याच्या नादात तुम्ही मोठ्या खर्चाचा धोका पत्करत आहात, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
थंडीत फ्रिज जास्त वीज वापरतो का?
अनेक लोकांचा हा दावा असतो की फ्रिज वर्षभर सारखीच वीज वापरतो. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. थंडीच्या दिवसांत खोलीचे तापमान आधीच कमी असल्याने, कंप्रेसरला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि त्यामुळे वीजेचा वापर आपोआप कमी होतो. जर तुम्ही फ्रिज 'लो कूलिंग मोड'वर सेट केला, तर वीज खर्च आणखी कमी होतो. म्हणजेच, फ्रिज बंद करण्याची गरजच नाही.
'विंटर मोड' आणि 'इको मोड'चा वापर
आजकालचे बहुतेक आधुनिक रेफ्रिजरेटर्स 'विंटर मोड' किंवा 'इको मोड' यांसारख्या विशेष वैशिष्ट्यांसह येतात. हे मोड्स कमी तापमानात फ्रिजचे योग्य संचालन करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
कशी घ्याल फ्रिजची काळजी?
- फ्रिजचे तापमान 'लेव्हल १' किंवा '२' वर सेट करा.
- कूलिंग किमान स्तरावर ठेवा.
- फॅन किंवा फ्रीजर 'हाय मोड' मध्ये चालवू नका.
- असे केल्याने कंप्रेसरचे आरोग्य चांगले राहते आणि मशीनचे आयुष्य वाढते.
फ्रिज कधी बंद करणे सुरक्षित?
- फक्त अशा परिस्थितीतच फ्रिज बंद करणे सुरक्षित मानले जाते, जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी (उदा. २०-३० दिवसांसाठी) घराबाहेर जात असाल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील.
- फ्रिज आतून पूर्णपणे रिकामे करा.
- वीज काढण्यापूर्वी तो पूर्णपणे कोरडा करा.
- आतील बाजूस बुरशी लागू नये म्हणून दरवाजा थोडा उघडा ठेवा.
रोजच्या थंडीत फ्रिज बंद करणे हा वीज वाचवण्याचा सोपा उपाय नसून ती एक गंभीर चूक आहे. यामुळे कंप्रेसर खराब होऊ शकतो, गॅस लीक होऊ शकते आणि मोठा दुरुस्ती खर्च लागू शकतो. त्याऐवजी, फ्रिज लो कूलिंग किंवा इको मोडमध्ये चालवा आणि धोका न पत्करता वीजही वाचवा व मशीनचे आयुष्यही वाढवा.












Click it and Unblock the Notifications