Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऑन ड्युटी 'अग्निवीर'चा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना काय मिळते; जाणून घ्या,काय आहेत नियम

Agniveer dies on duty, Agnipath scheme : नाशिक येथील आर्टिलरी छावणीत शुक्रवारी मोठी घटना घडली. प्रशिक्षणादरम्यान काही सैनिक तोफखान्यातून गोळीबार करण्याचा सराव करत होते, त्याच दरम्यान अचानक स्फोट झाला. या अपघातात दोन अग्निवीर ठार झाले. नेमका स्फोट कशाने झाला याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, ऑन ड्युटी अग्निवीरचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने काय मदत दिली, त्यासाठी केंद्रशासनाच्या वतीने काय नियम घालून दिले आहेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

अग्निवीरला किती पगार मिळतो?

अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या सैनिकांना म्हणजेच अग्निवीरांना नोकरीच्या पहिल्या वर्षी दरमहा 30 हजार रुपये पगार मिळतो, त्यापैकी 21 हजार रुपये हातात मिळतात आणि पगाराच्या 30 टक्के म्हणजे 9 हजार रुपये विविध सेवाअंतर्गत कपात केली जाते. सेवा निधी म्हणून ही रक्कम कपात होते. अग्निवीरच्या पगारात दरवर्षी 10 टक्के वाढ केली जाते आणि त्यातील 30 टक्के रक्कम सेवा निधी म्हणून कापली जाते. विशेष बाब म्हणजे, त्यांचा सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर, त्यांच्या पगारातून नोकरीच्या पहिल्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत सेवा निधी म्हणून कापलेले पैसे त्यांना जोडले जातात आणि एकत्र दिले जातात. त्यात सरकारच्या वतीने दुप्पट करते. म्हणजेच अग्निवीरला 4 वर्षांच्या सेवेनंतर सुमारे 10 लाख रुपये एक हाती रक्कम मिळते.

Agniveer

ऑन ड्युटी मृत्यू झाल्यास, कुटुंबाला काय?

एखाद्या अग्निवीरचा ड्युटीवर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून भरपाई दिली जाते. यासंदर्भात लष्कराच्या संकेतस्थळानुसार, ड्युटीवर असताना अग्निवीरचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण, 44 लाख रुपयांची अतिरिक्त सानुग्रह रक्कम, उर्वरित 4 वर्षांच्या कालावधीसाठी संपूर्ण वेतन दिले जाईल. सेवा निधी दिला जातो.

अपंगत्व आल्यास काय मिळते?

एखादा अग्निवीर सैनिक ड्युटीवर अपंग झाल्यास त्याला अपंगत्वाच्या आधारे रक्कम दिली जाते. जर अग्निवीर 100 टक्के अपंग झाला तर त्याला 44 लाख रुपये मिळतील. त्याचवेळी, अग्निवीर 75 टक्के अपंग झाल्यास त्याला 25 लाख रुपये आणि ५० टक्के अपंगत्व आल्यास 15 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. याशिवाय त्यांना 4 वर्षांचे पूर्ण वेतन, सेवानिधी फंडात जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदानही मिळते.

अग्निपथ योजना कधी सुरू झाली?

केंद्रसरकारच्या वतीने, 2022 मध्ये भारतीय सैन्यात सैनिकांच्या भरतीसाठी एक नवीन योजना सुरू केली होती, ज्याचे नाव होते 'अग्निपथ योजना'. या योजनेंतर्गत सैन्यात 4 वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाते आणि अशा सैनिकांना 'अग्नवीर' म्हटले जाते. या योजनेअंतर्गत सशस्त्र दलात सैनिक भरतीसाठी वय 17.5 ते 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या अग्निपथ योजनेद्वारे आत्तापर्यंत हजारो सैनिकांची भारतीय लष्कर, हवाई आणि नौदलात भरती करण्यात आलेली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+