Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राशनकार्डधारकांनो.. ई- केवायसी करा नाही तर मोफत अन्नधान्य विसरा! नाव वगळले जाणार; एकच दिवस बाकी

Ration Card EKYC deadline 30 April 2025 : राशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही ईकेवायसी आतापर्यंत केली नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.

इकेवायसी करण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असून तुम्ही जर ईकेवायसी अद्याप केली नसेल तर ती तुम्हाला करावी लागणार आहे. अन्यथा तुमचे नाव राशनकार्डमधून वगळले जाण्याची शक्यता आहे.

Ration Card EKYC deadline

30 एप्रिल शेवटची तारीख

राशनकार्ड धारकांनी ईकेवायसी केली नसेल तर तु्म्हाला ही संधी आहे, उद्या 30 एप्रिलपर्यंत 2025 राशनकार्डधारकांना ईकेवायसी करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला राशनदुकानदाराकडे जाऊन ईकेवायसी करुन घेता येणार आहे. ईकेवासयीसाठी तुम्हाला तुमचे आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे लागणार आहे. याआधी 31 मार्च 2025 ही ई-केवायसी करण्याची तारीख होती पण ती एक महिन्याने वाढवण्यात आलेली आहे.

जागरणने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, आतापर्यंत शासनामार्फत दोन लाख साठ हजार 829 पैकी दोन लाख 19 हजार 11 राशनकार्ड धारकांनी ईकेवायसी केली आहे. रायबरेली तहसीलअंतर्गत 51, 423 पात्र कुटुंब आणि आठ हजार 291 अंत्योदय कार्डधारक आहेत.

ई-केवायसी कशी करायची घ्या जाणून

  • इकेवायसी पूर्ण करण्यासाठी अधिकृत प्रक्रिया केंद्रावर तुम्ही जाऊ शकता.
  • इकेवायसी करण्यासाठी स्थानिक सरकारी रेशन दुकानाला भेट तुम्ही देऊ शकता.
  • तुमच्या नेहमीच्या रेशनदुकानदाराला पॉइंट ऑफ सेल (ई- पाॅज) मशीनवर फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करा अथवा OTP पद्धती वापरा. एकतर तुमचा रेशन दुकानदार ही प्रक्रिया करेल.
  • तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचे फोटो यासारखी आवश्यक कागदपत्रे ईकेवायसीवेळी सोबत ठेवा व गरजेप्रसंगी सादर करा.
  • कागदपत्रे आणि दस्ताऐवजानुसार, तुम्हीच रेशनकार्ड धारक आहात अशी पडताळणी झाल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया कोणत्याही शुल्काशिवाय पूर्ण होईल.

ईकेवायसी मोफत, शुल्क देऊ नका

सरकारने सर्व कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रियेवर देखरेख करण्याचे काम रेशन दुकानदाराकडे सोपवले आहे. त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणून आपण या सेवेसाठी कोणतेही शुल्क देऊ नये.

राशनकार्ड आधार लिंक करण्याची ही आहे शेवटची तारीख

सरकारने रेशनकार्ड धारकांना रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी पुढील तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. आता नवीन अंतिम मुदत 30 जून 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. पूर्वी ही अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत होती. सरकारी नियमानुसार दिलेल्या वेळेत ई-केवायसी पालन न केल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द केले होते, ज्यामुळे त्यांना मोफत रेशन सारख्या फायद्यांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे तुमचे रेशनकार्ड आधार लिंकशी जोडून घ्या.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+