नागरिकत्व कसे सिद्ध होते? कसे ठरवले जाते? या प्रश्नांची उत्तरे तुम्हालाही माहित असावीत
पहलगाम हल्ल्यानंतर बाहेरच्या देशातील अवैध भारतात राहणाऱ्या नागरिकांची चर्चा सुरु झाली. त्यांची शोधमोहिम सुरु करुन त्यांची त्यांच्यात्यांच्या देशात रवानगी करण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणात सर्वांना प्रश्न पडला की, नागरिकत्व कसे सिद्ध करायचे किंवा ते कसे मिळवायचे? या प्रश्नासाठी नागरिकत्व कसे ठरवले जाते, ते आपण पाहू...

नागरिकत्व कसे सिद्ध होते?
भारत स्वतंत्र झाल्यानंतर नागरिकत्व कायदा १९५५ हाच खरं तर भारतीय नागरिकत्व संपादन कायदा आहे. या कायद्यानुसार, भारतात एकल नागरिकत्वाची तरतूद आहे. याचा अर्थ असा की, भारताचा नागरिक इतर कोणत्याही देशाचा नागरिक असू शकत नाही. आता या कायद्यात अनेक वेळा आवश्यकेनुसार बदल करण्यात आले. भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी, तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र आणि जमीन किंवा मालमत्तेची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
जन्मानुसार नागरिकत्व कसे मिळते?
पूर्वी, भारतात जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व दिले जात असे. परंतु १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ नंतर जन्मलेल्या मुलांसाठी त्यांच्या पालकांपैकी एक भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे अशी अट घालण्यात आली. ३ डिसेंबर २००४ नंतर भारतात जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला, ज्याचे दोन्ही पालक भारतीय आहेत, किंवा त्यापैकी किमान एक भारतीय नागरिक आहे आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नाही, त्याला नागरिकत्व मिळेल, असे सांगण्यात आले.
नागरिकत्वाचे काही नियम
- नोंदणी केल्यावर नोंदणीद्वारेही भारतीय नागरिकत्व मिळू शकते. पण यासाठीही काही नियम आहेत. भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी, व्यक्तीला ७ वर्षे भारतात राहणे आवश्यक आहे. भारतीय वंशाची व्यक्ती जी अविभाजित भारताबाहेरील कोणत्याही देशाचा नागरिक आहे, म्हणजे जर तो पाकिस्तान किंवा बांगलादेशचा नागरिक असेल आणि त्या देशाचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिक बनू इच्छित असेल. ज्याचा विवाह भारतीय नागरिकाशी झाला आहे आणि नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी त्याने कमीत कमी सात वर्षे भारतात वास्तव्य केले आहे.
- २६ जानेवारी १९५० रोजी किंवा त्यानंतर भारताबाहेर जन्मलेली परंतु ज्यांचे पालक भारतीय नागरिक आहेत अशी कोणतीही व्यक्ती वंशाच्या आधारावर भारताची नागरिक होऊ शकते. १० डिसेंबर १९९२ नंतर आणि ३ डिसेंबर २००४ पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती, ज्याच्या पालकांपैकी एक भारतीय नागरिक आहे.ज्याचा जन्म ३ डिसेंबर २००४ नंतर झाला आहे आणि व तिच्याकडे इतर कोणत्याही देशाचा पासपोर्ट नसल्याचे सिद्ध करू शकतो, ते व्यक्तीही नागरिकत्व घेऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications