Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रासारखीच बिहारमध्ये चोरी! राहुल गांधींचा निवडणूक आयोग, भाजपवर मोठा आरोप! बघा व्हिडिओ..

Rahul Gandhi accuses election commission BJP : भाजप पुर्ण देशात संविधानावर आक्रमण करत आहे. जिथे पाहाल तिथे संविधानावर भाजपचे लोक आक्रमण करत आहे. महाराष्ट्रात जशी निवडणूक चोरली तशीच बिहारमध्ये निवडणूक चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी बिहारमध्ये निवडणूक आयोगाने नवीन कट रचला आहे. इलेक्शन कमीशन भाजपचे काम करत आहे असा गंभीर आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधीपक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi

बिहारच्या भुवनेश्वर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेदरम्यान एक कोटी नवीन मतदार आले, आम्ही निवडणूक आयोगाला एकदा नव्हे अनेकदा म्हटले की, आम्हाला मतदार याद्या द्या,व्हिडिओग्राफी द्या, ते निवडणूक आयोग देत नाही, जी चोरी महाराष्ट्रात झाली तीच चोरी पुन्हा हे लोक बिहारमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप राहुल गांधींनी केला.

एका बाजूला गरीब लोक दुसरीकडे अब्जाधीश!

भुवनेश्वर येथील संविधान बचाव सामवेश येथे, लोकसभेचे खासदार राहुल गांधी म्हणाले, "...ओडिशा सरकारचे फक्त एकच काम आहे - राज्यातील गरीब लोकांच्या हातून ओडिशाची संपत्ती हिसकावून घेणे... पूर्वी, बीजेडी सरकारने हे केले आणि आता भाजप सरकार हे करत आहे. एका बाजूला, ओडिशातील गरीब जनता, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, शेतकरी आणि कामगार आहेत आणि दुसऱ्या बाजूला, ५-६ अब्जाधीश आणि भाजप सरकार आहे. ही लढाई सुरू आहे. ओडिशातील लोकांसह फक्त काँग्रेस कार्यकर्तेच ही लढाई जिंकू शकतात; दुसरे कोणीही नाही."

Take a Poll

महाराष्ट्रासारखीच बिहारमध्ये चोरी!

राहुल गांधी म्हणाले, "...मी काल बिहारमध्ये होतो. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे 'चुनाव चोरी' करण्यात आली होती, त्याचप्रमाणे बिहारमध्येही असाच प्रयत्न केला जात आहे. 'चुनाव चोरी'साठी, निवडणूक आयोगाने एक नवीन कट रचला आहे. निवडणूक आयोग भाजपच्या शाखेसारखे काम करत आहे, ते स्वतःचे काम करत नाही. महाराष्ट्रात, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, १ कोटी नवीन मतदार जोडले गेले. हे मतदार कोण होते आणि ते कुठून आले हे कोणालाही माहिती नाही.

आम्ही निवडणुकीची 'चोरी' करू देणार नाही...' - राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला अनेक वेळा मतदार यादी आणि व्हिडिओग्राफी देण्यास सांगितले. पण निवडणूक आयोग आम्हाला ते देत नाही. ते बिहारमध्येही तीच 'चोरी' करणार आहेत, जी महाराष्ट्रात केली गेली होती. मी काल बिहारला गेलो होतो आणि भारत आघाडीच्या नेत्यांसोबत, मी म्हणालो होतो की आम्ही निवडणूक आयोग आणि भाजपला बिहार निवडणुकीची 'चोरी' करू देणार नाही...'

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+