राष्ट्रपतींच्या बंगाल दौऱ्यावरून रणकंदन; आदिवासी अस्मिता, प्रोटोकॉल अन् मोदी-ममता सरकारमध्ये संघर्ष
President Droupadi Murmu West Bengal controversy : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात आयोजित 'आंतरराष्ट्रीय संताल परिषदे'वरून सध्या देशाच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल आणि राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर, या प्रकरणाला आता आदिवासी सन्मान विरुद्ध राजकीय अनास्था असे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कठोर शब्दात ममता सरकारवर निशाणा साधला.

राष्ट्रपतींची 'असामान्य' स्पष्टोक्ती अन् थेट नाराजी!
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संताल परिषदेला संबोधित करताना अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली खंत व्यक्त केली. परिषदेचे ठिकाण बदलल्यामुळे अनेक संताल बांधवांना या उत्सवात सहभागी होता आले नाही, याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. "येथे विस्तीर्ण जागा उपलब्ध असताना, पाच लाख लोक सहज जमू शकले असते. मात्र, ठिकाण बदलल्याने सामान्य आदिवासी जनता आपल्याच संस्कृतीच्या महोत्सवापासून वंचित राहिली," असे राष्ट्रपती म्हणाल्या. एखाद्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे जाहीरपणे प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवणे ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.
This is shameful and unprecedented. Everyone who believes in democracy and the empowerment of tribal communities is disheartened.
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026
The pain and anguish expressed by Rashtrapati Ji, who herself hails from a tribal community, has caused immense sadness in the minds of the people… https://t.co/XGzwMCMFrT
पंतप्रधान मोदींचा 'तृणमूल'वर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत 'एक्स' (ट्विटर) वरून ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी या परिस्थितीला "लज्जास्पद आणि अभूतपूर्व" असे संबोधले. लोकशाही आणि आदिवासी सक्षमीकरणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ही खेदजनक बाब आहे. तृणमूल सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या असून हा राष्ट्रपतींचा अपमान आहे," असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपतींचे पद राजकारणाच्या पलीकडे असते, असे सांगत पंतप्रधानांनी संताल संस्कृतीच्या हाताळणीवरून ममता सरकारवर धारेवर धरले.
International Santal Council, a private organisation, invited Hon’ble President to the 9th International Adivasi Santal Conference in Siliguri.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) March 7, 2026
After Advanced Security Liaison, district administration flagged in writing to the President’s Secretariat that the organiser appeared…
वादाचे मूळ: ठिकाण बदल आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन
या वादामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला ही परिषद विधाननगर (दार्जिलिंग) येथे होणार होती, मात्र राज्य सरकारने ती बागडोगराजवळील गोसाईपूर येथे हलवली. राष्ट्रपतींच्या मते, या दुर्गम ठिकाणामुळे संताल समुदायाची उपस्थिती घटली. राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री किंवा किमान एका वरिष्ठ मंत्र्याने उपस्थित राहणे अनिवार्य असते. मात्र, विमानतळावर केवळ सिलिगुडीचे महापौर गौतम देब उपस्थित होते. यावर भाष्य करताना राष्ट्रपती भावूक झाल्या, त्या म्हणाल्या, "मी स्वतःला बंगालची मुलगी मानते आणि ममताजींना धाकटी बहीण मानते, मग मुख्यमंत्री माझ्यावर का नाराज आहेत?"
#WATCH | Kolkata | On President Droupadi Murmu's statement, West Bengal Chief Minister Mamata Banerjee says, "Before commenting on West Bengal, you should see the condition of the BJP-ruled states... It is not right to comment after listening to just one political party..." https://t.co/o4RnIHJeuf pic.twitter.com/S5sR2zros7
— ANI (@ANI) March 7, 2026
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे स्पष्टीकरण
वाढता वाद पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते, राष्ट्रपती सचिवालयाने दिलेल्या 'मंजूर लाईनअप' नुसारच स्वागत आणि निरोप देण्यात आला. स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी सर्व जबाबदारी पार पाडली आहे. आयोजकांच्या अपुऱ्या तयारीमुळे काही समस्या उद्भवल्या असाव्यात, त्यात प्रशासनाचा दोष नाही.
केंद्राचा आक्रमक पवित्रा: सविस्तर अहवाल मागितला!
या प्रकरणाने आता प्रशासकीय लढाईचे रूप घेतले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या 'कथित त्रुटीं'बद्दल पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांकडून रविवारी संध्याकाळपर्यंत सविस्तर अहवाल मागवला आहे. यामध्ये विचारले गेले की, स्वागत प्रोटोकॉलचे पालन का झाले नाही?, शेवटच्या क्षणी परिषदेचे ठिकाण आणि प्रवासाचा मार्ग का बदलण्यात आला?, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक प्रस्थानावेळी का उपस्थित नव्हते? तसेच दोषी अधिकाऱ्यांवर (DM, CP) कोणती कारवाई केली जाणार?, यासह अनेक प्रश्नाबाबत माहिती विचारण्यात आली.
राष्ट्रपतींनी संथाल तरुणांना केले आवाहन!
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याच परिषदेत बोलताना पुढे सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात संथाल समाजाच्या योगदानाला योग्य ओळख मिळाली नाही. अनेक महान व्यक्तींना जाणूनबुजून इतिहासात समाविष्ट केले गेले नाही. त्यांनी तरुणांना शिक्षण स्वीकारण्याचे, भाषा आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले. त्या पुढे म्हणाल्या की, संथाल समुदायासाठी ही अभिमानाची बाब आहे की, आपले पूर्वज, तिलका मांझी यांनी सुमारे 240 वर्षांपूर्वी शोषणाविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले होते. त्यांच्या बंडानंतर सुमारे 60 वर्षांनी, शूर बंधू सिदो-कान्हू आणि चांद-भैरव यांनी शूर भगिनी फूलो-झानो यांच्यासोबत मिळून 1855 मध्ये संथाल हुलचे नेतृत्व केले.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस











Click it and Unblock the Notifications