पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात, म्हणाले - रोजगारावर खोटे बोलणाऱ्यांची बोलती बंद!
मुंबई - गेल्या तीन-चार वर्षात देशात 8 कोटी रोजगार मिळाले आहेत. या आकड्याने खोटे बोलणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे. त्यांचे प्रत्येक धोरण रोजगाराला आणि युवकांचा विश्वासघात करणारे आहे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.
एनडीए सरकार, गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांना सशक्त करीत आहे. महायुती सरकारही याच पद्धतीने महाराष्ट्रात काम करीत आहे. युवकांत कौशल्यविकासासाठी महाराष्ट्र सरकार काम करीत असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत आज सुमारे 29 हजार कोटींहून अधिक रकमेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन, पायाभरणी झाली. त्यानंतर ते संबोधन करीत होते.

दहा लाख रोजगार मिळणार
पंतप्रधान म्हणाले, केंद्राने महाराष्ट्रासाठी 76 कोटी रुपयांचा प्रकल्प महाराष्ट्राला दिला. त्यातून महाराष्ट्रात दहा लाख रोजगार मिळणार आहे. मुंबई देशविदेशातील गुंतवणुकीच्या उत्सवाचा साक्षीदार बनली आहे. आमच्या तिसऱ्या टर्मच्या सरकारचे देशाने स्वागत केले. एनडीए सरकारच देशाला स्थिरता देऊ शकते. मी सांगितले होते की, तिसऱ्या टर्मला एनडीए सरकार तिप्पट वेगाने काम करणार आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी
पंतप्रधान म्हणाले, महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे. सशक्त वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. विकसित भारतात महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. मुंबई देशाची फायनान्शियल हब बनली आहे. मुंबईला जगातील मोठी इनटेक कॅपिटल बनवण्याचे स्वप्न आहे. मुंबईत काय नाही सर्वच आहे. महाराष्ट्र विकासाची गाथा लिहित असून आपण सर्व या यात्रेकरु आहे.
अटलसेतूत अडथळे आणले
पंतप्रधान म्हणाले, पुढच्या 25 वर्षात भारत विकसित राष्ट्र होईल. यात मुंबई, महाराष्ट्राची मोठी भूमिका राहणार आहे. मुंबईच्या आसपासच्या क्षेत्राला कनेक्टीव्हीटी वृद्धींगत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अटलसेतू, कोस्टलरोड बनला. अटल सेतू बनवला त्याला विरोधाचा प्रयत्न झाला हा प्रकल्प अडकवण्याचेही प्रयत्न झाले. 20 हजार गाड्या रोज येथून जात असून रोज 20 ते 25 लाखांचे इंधन वाचत आहे. लोकांना पनवेलला जाण्यासाठी 45 मिनिटे वाचत आहेत. आम्ही मुंबईची वाहतुक व्यवस्था आधुनिक बनवत आहोत. मुंबई मेट्रोचे काम गतीने करीत आहोत.
8 किमीची मेट्रोलाईन 80 किमीवर
पंतप्रधान म्हणाले, दहा वर्षांपुर्वी केवळ 8 किमीचीच मेट्रो लाईन होती ती आज 80 किमीपर्यंत पोहचली आहे. भारतीय रेल्वेचा मुंबई आणि महाराष्ट्राला फायदा होत आहे. गेल्या दहा वर्षात राष्ट्रीय मार्गाची लांबी तिप्पट झाली आहे. तिर्थक्षेत्रांचा विकास हा एनडीए सरकारचा प्रयत्न आहे.
पंढरपूर वारीसाठी लाखो वारकरी भक्तिभावाने सहभागी झाले आहे. पुणे ते पंढरपूर वारी सुखकर व्हावा याची जबाबादारी एनडीए सरकारवर आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्गही लवकरच पुर्ण होणार असून मी सर्व वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो असेही पीएम मोदी म्हणाले.
राज्य सरकारची थोपटली पाठ
पंतप्रधान म्हणाले, एनडीए सरकार, गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांना सशक्त करीत आहे. महायुती सरकारही याच पद्धतीने काम करत आहे. युवकांत कौशल्यविकासासाठी महाराष्ट्र सरकार काम करीत आहे, असे म्हणत राज्य सरकारची पीएम मोदींनी पाठ थोपटली.
गेल्या तीन-चार वर्षात देशात आठ कोटी रोजगार मिळाले आहेत. या आकड्याने रोजगारावर खोटे बोलणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे. त्यांचे प्रत्येक धोरण रोजगाराला आणि युवकांचा विश्वासघात करणारी आहे. देशात रोजगारनिर्मिती वाढ आहे. येत्या काळात नव्या गुंतवणुक वाढणार आहे.
३ कोटी गरीबांना पक्के घर देणार
पंतप्रधान म्हणाले, वंचितांना पुढे आणण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. देशात रोजगारनिर्मिती वाढ आहे. येत्या काळात नव्या गुंतवणुक वाढणार आहे. वंचितांना पुढे आणण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. येत्या काळात तीन कोटी गरीबांना पक्के घर देणार आहोत.












Click it and Unblock the Notifications