LDF-UDFच्या 'आळी-पाळी'ने केरळचे नुकसान!; PM मोदींची केरळमध्ये गर्जना; 10,800 कोटींची भेट!
PM Narendra Modi Kerala Visit : "केरळमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या एलडीएफ (LDF) आणि यूडीएफ (UDF) यांच्या 'ळी'च्या राजकारणाने राज्याला विकासापासून दूर नेले असून भ्रष्टाचार वाढवला आहे," असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची येथे केला. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांच्या या दौऱ्याने केरळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

केरळचा 'केरळम' असा गौरव!
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मल्याळम भाषेतून करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे, राज्याचे अधिकृत नाव 'केरळम' करण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत ते म्हणाले की, "आता संपूर्ण जग या राज्याला 'केरळम' म्हणूनच ओळखेल. हा मल्याळी संस्कृती आणि वारशाचा सन्मान आहे."
10,800 कोटींचे प्रकल्प; विकासाची नवी दिशा
पंतप्रधानांनी केरळला पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील मोठी भेट दिली आहे. यामध्ये प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
बीपीसीएल पॉलीप्रॉपिलीन युनिट: कोची रिफायनरी येथे ५,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. ४०० किलोटन वार्षिक क्षमता असलेले हे युनिट पॅकेजिंग आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्राला नवी गती देईल.
कनेक्टिव्हिटीवर भर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत (PMGSY) २३ नवीन रस्त्यांचे उद्घाटन करून ग्रामीण भागातील रस्ते जाळे अधिक मजबूत करण्यात आले आहे.
रेल्वे आणि महामार्ग : रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गांचे विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित करून केरळच्या दळणवळणात क्रांती घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कोचीमध्ये 'मोदी लाट': भव्य रोड शो
जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमजवळ आयोजित ३०० मीटर लांबीच्या रोड शोमध्ये जनसागराचा महापूर लोटला होता. हातात भाजपचे झेंडे आणि भगव्या टोप्या घातलेले हजारो समर्थक "मोदी, मोदी!" अशा घोषणा देत होते. पंतप्रधानांनी कारमधून उतरून लोकांशी थेट संवाद साधत आगामी निवडणुकीसाठी एनडीएच्या प्रचाराचा बिगुल वाजवला.
"टर्न-टेकिंग" राजकारणावर प्रहार
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केरळमधील सत्ता परिवर्तनाच्या जुन्या पद्धतीवर (LDF-UDF चक्र) जोरदार टीका केली. ते म्हणाले, "या दोन्ही आघाड्यांना माहित होते की पाच वर्षांनी आपली पाळी पुन्हा येणार आहे, त्यामुळे त्यांनी विकासाऐवजी भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले. केरळची जनता आता या दुष्टचक्राला कंटाळली असून विकासासाठी एनडीएच्या पर्यायाकडे आशेने पाहत आहे."
२०२६ च्या निवडणुकीसाठी निर्णायक पाऊल
१०,८०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि जनसभेतील गर्दी पाहता, भाजपने केरळमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आधारित हा दौरा आगामी विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो.












Click it and Unblock the Notifications