रुपाली चाकणकरांचे भोंदूबाबाला १७७ कॉल्स? आणखी दोन सर्वात धक्कादायक नावं समोर
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता केवळ लैंगिक शोषणापुरती मर्यादित न राहता राजकीय लागेबांध्यांपर्यंत पोहोचली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत खरातच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डचा (CDR) स्फोट करत अनेक बड्या नेत्यांची नावे जाहीर केली आहेत.

१ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या काळातील हा तपशील असून, दमानिया यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांकडे चौकशीची मागणी केली आहे. या सीडीआरमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे खरातशी असलेले संबंध उघड झाले असून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे रुपाली चाकणकर. दमानिया यांच्या दाव्यानुसार, चाकणकर या खरातला 'गुरू' मानत असत आणि त्यांनी खरातला तब्बल १७७ वेळा कॉल केले आहेत. संभाषणाच्या वेळेचा विचार करता रुपाली चाकणकर यांनी खरातशी ३३,७२७ सेकंद संवाद साधला आहे, जो अत्यंत संशयास्पद वाटतो. तसेच प्रतिभा चाकणकर यांच्या फोनवरूनही २३६ कॉल्स झाले आहेत. इतका वेळ गुरू-शिष्यामध्ये नेमकी काय चर्चा होत होती आणि यात कोणते आर्थिक किंवा इतर हितसंबंध गुंतले आहेत, याची सखोल चौकशी करून संबंधितांना अटक करण्याची मागणी दमानिया यांनी लावून धरली आहे.
केवळ चाकणकरच नव्हे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खरातला १७ वेळा कॉल केल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. यामध्ये १० इनकमिंग आणि ७ आउटगोइंग कॉल्स असून एकूण २१ मिनिटांचे संभाषण झाले आहे. याशिवाय भाजप नेते चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचीही नावे खरातच्या संपर्क यादीत आढळली आहेत. परदेशातून, विशेषतः कतार आणि युएस सारख्या देशांतून खरातला आलेले फोन हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा मोठ्या आर्थिक गुंतवणुकीशी जोडलेले असण्याची शक्यता निर्माण करत आहेत.
आर्थिक गैरव्यवहाराचा भाग म्हणून कोपरगावच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेतील धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील ५७ खातेदारांच्या १०० खात्यांवर अशोक खरात हा 'वारसदार' (Nominee) म्हणून नोंदवला गेला आहे. या खात्यांमधून ६० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले असून, ही सर्व खाती खरातच्या मोबाईल नंबरशी जोडलेली आहेत. यातील काही खाती चाकणकर नावाच्या व्यक्तींच्या नावे असून, त्यात प्रतिभा चाकणकर यांच्या नावाचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या या रॅकेटमध्ये राजकारण्यांचा नक्की सहभाग काय, हे आता तपासाअंती स्पष्ट होईल.
-
अयोध्येत गौतम अदानी यांनी व्यक्त केला श्रद्धा आणि सेवेचा संकल्प; भारताच्या जिवंत परंपरांचा केला गौरव -
अदानी ग्रीन एनर्जीचा जागतिक विक्रम: एकाच वर्षात ५ GW क्षमतेची विक्रमी वाढ! -
नक्की काय शिजतंय? सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक; दोन मंत्री अनुपस्थित -
भारताच्या प्रगतीला अदानी पोर्ट्सचा वेग; ५०० दशलक्ष टन माल हाताळणीचा ऐतिहासिक टप्पा पार -
अयोध्येत गौतम अदानी यांनी व्यक्त केला श्रद्धा आणि सेवेचा संकल्प; भारताच्या जिवंत परंपरांचा केला गौरव








Click it and Unblock the Notifications