Video: पंतप्रधान मोदींनी पवारांना खुर्चीवर बसवलं,नंतर पाण्याने ग्लास भरला, सभागृह टाळ्यांचा कडकडाट
देशाची राजधानी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन समारंभ शुक्रवारी नवी दिल्लीत पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रख्यात मराठी लेखिका तारा भवाळकर आणि संमेलनाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि शरद पवार जवळ बसले होते. त्यावेळी मोदींनी व्यासपीठावर आलेल्या शरद पवारांना मदत करण्यासाठी हात पुढे केला.

आधी पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना खुर्चीवर बसवलं, पाण्याचा ग्लास भरुन दिला
सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा आहे. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या खुर्च्या एकमेकांच्या जवळ ठेवण्यात आल्या होत्या, जेव्हा शरद पवार त्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी पोहोचले तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासाठी खुर्ची ओढली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाण्याचा ग्लास भरून शरद पवारांकडे सरकवताना दिसले. पंतप्रधानांच्या या कृतीनंतर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमले. हा व्हिडीओ पाहून यूजर पंतप्रधान मोदींच कौतूक करत आहेत.
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या खुर्च्या एकमेकांच्या अगदी शेजारी ठेवण्यात आल्या होत्या. त्याच वेळी जेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलित होत होते. त्यावेळीही पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना पुढे बोलावत त्यांच्यासोबत दिवा लावला. यावेळी उपस्थित लोकांनीही खूप टाळ्या वाजवल्या. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या उद्घाटन भाषणात मराठी साहित्याचे कौतुक केले तर शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi and NCP chief Sharad Pawar at the inauguration of the 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan.
— ANI (@ANI) February 21, 2025
(Source: DD News) pic.twitter.com/W2TJpqyeqv
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना म्हणाले की, आर्थिक राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार..समर्थ रामदासांनी "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा" असे म्हटले होते. भारताला जेव्हा अध्यात्मिक ऊर्जेची गरज असते, तेव्हा मराठीतील महान संतांनी आणि ऋषींच्या भाषेतील विचार मराठी भाषेत आणले. आज मराठी भाषेचा हा प्रतिष्ठित कार्यक्रम दिल्लीच्या भूमीवर होत आहे.
मी मराठीतून विचार केला तर मला संत ज्ञानेश्वरांचे विचार आठवतात. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापनाही मराठीच होते. आरएसएसने जे बिज रोवलं त्याचा आता वटवृक्ष झाला. शंभर वर्षांपासून संघ चालवत आहे, माझ्यासारख्या अनेकांना संघांनी जगायला शिकवले आणि संघामुळेच मराठीशी माझा संबंध आला असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे फक्त एका भाषेपुरते किंवा एका राज्यापुरते मर्यादित नाही. स्वातंत्र्यलढ्याचे सार मराठी साहित्य संमेलनात आहे. १८७८ मध्ये पहिल्या आवृत्तीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने देशाच्या १४७ वर्षांच्या प्रवासाचे साक्षीदार म्हणून काम केलं आहे.
शरद पवार जी यांच्या निमंत्रणावरून मला या गौरवशाली परंपरेत सामील होण्याची संधी मिळत आहे. मराठी भाषा अमृतापेक्षा गोड आहे, म्हणून तुम्हाला मराठी भाषेवरील आणि मराठी संस्कृतीवरील माझे प्रेम चांगलेच माहिती आहे. मी तुमच्या विद्वानांइतका मराठीत प्राविण्य नाही, पण मी सतत मराठी बोलण्याचा, नवीन मराठी शब्द शिकण्याचा प्रयत्न केला आहे, असं पंतप्रधान मोदींनी यांनी म्हटलं आहे












Click it and Unblock the Notifications