नागपूर-पुणे मेट्रो ट्रेनचे लोकार्पण! मेक इन इंडिया'मुळे देशाचा विकास; वाचा मोदींचे संपूर्ण भाषण!
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या कर्नाटक दौऱ्यात देशाच्या प्रगती आणि तांत्रिक सामर्थ्यावर भर दिला. बेंगळुरूमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' चा उल्लेख केला आणि भारतीय सैनिकांच्या शौर्याचे कौतुक केले.
या ऑपरेशनमध्ये दहशतवादी आणि पाकिस्तानला गुडघे टेकवण्याची ताकद भारताने जगाला दाखवून दिली, असे ते म्हणाले. या यशामागे 'मेक इन इंडिया' आणि तंत्रज्ञानाची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले, ज्यात बंगळुरूमधील तरुणांचे योगदान महत्त्वाचे आहे.

तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा
पंतप्रधानांनी बेंगळुरूमधील केएसआर रेल्वे स्टेशनवर तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे बेंगळुरू ते बेळगाव, अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर (अजनी) ते पुणे या मार्गांवरचा प्रवास जलद आणि आधुनिक होईल. या गाड्या देशाच्या विविध भागांना जोडण्यास मदत करतील.
#WATCH | Bengaluru | Prime Minister Narendra Modi undertakes a metro ride from RV Road (Ragigudda) to Electronic City metro station via the Yellow line that PM Modi inaugurated earlier today.
— ANI (@ANI) August 10, 2025
(Source: ANI/DD) pic.twitter.com/U4SrPGjWWc
बेंगळुरूमध्ये २२ हजार कोटींचे प्रकल्प!
पंतप्रधानांनी बेंगळुरूमध्ये २२ हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यात बेंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचे उद्घाटन विशेष महत्त्वाचे आहे. ही लाईन आरव्ही रोडपासून बोम्मासंद्रापर्यंत जाईल, ज्यामुळे लाखो लोकांना फायदा होईल. पंतप्रधान म्हणाले की, यलो आणि ऑरेंज मेट्रो लाईन सुरू झाल्यावर सुमारे २५ लाख लोकांना त्याचा लाभ मिळेल. तसेच, मेट्रो प्रकल्पासाठी निधी देणाऱ्या इन्फोसिससारख्या कंपन्यांचे त्यांनी आभार मानले.
Connectivity projects being launched in Bengaluru today will make travel smoother, faster and more convenient, while also boosting economic growth. https://t.co/UQgtiBfwqA
— Narendra Modi (@narendramodi) August 10, 2025
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे!
अर्थव्यवस्था : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला असून, लवकरच आपण पहिल्या तीनमध्ये असू. सुधारणा (Reforms), कामगिरी (Perform) आणि परिवर्तन (Transform) या तीन स्तंभांवर ही प्रगती आधारित आहे.
पायाभूत सुविधा : २०१४ पूर्वी देशात ७४ विमानतळ होते, आता त्यांची संख्या १६० पेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय जलमार्गांची संख्याही ३ वरून ३० झाली आहे.
आरोग्य आणि शिक्षण : पूर्वी ७ एम्स होती, आता २२ एम्स आणि ७०० वैद्यकीय महाविद्यालये आहेत.
तंत्रज्ञान : भारत जागतिक AI क्षेत्रात पुढे जात आहे आणि 'मेड इन इंडिया' चिप्स लवकरच उपलब्ध होतील.
िर्यात: २०१४ पूर्वी आपण मोबाईल आयात करत होतो, आता भारत टॉप ५ मोबाईल निर्यातदारांमध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक निर्यात ६ अब्ज डॉलर्सवरून ३८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
प्रशासकीय सुधारणा : सरकारने 'जन विश्वास विधेयक' मंजूर केले असून, लवकरच २.० देखील मंजूर होईल. राज्य सरकारांनीही असे कायदे करावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
बेंगळुरू मेट्रो नेटवर्कचा विस्तार!
यलो मेट्रो लाईनमुळे बेंगळुरू मेट्रोचे एकूण नेटवर्क ९६ किमीपेक्षा जास्त होईल. पंतप्रधानांनी मेट्रोच्या फेज-३ प्रकल्पाचीही पायाभरणी केली, ज्याचा खर्च १५,६१० कोटी रुपये आहे.
हा प्रकल्प ४४ किमीपेक्षा जास्त लांबीचा असेल आणि शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांना जोडेल. बेंगळुरूची 'नम्मा मेट्रो' ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मेट्रो आहे, जी दररोज ८ लाखांहून अधिक लोकांना सेवा देते.












Click it and Unblock the Notifications