Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PM Kisan Yojana : लवकरच शेतकऱ्यांना मिळणार 'पीएम किसान'चा 20 वा हप्ता! ही 3 कामे लगेच करा नाहीतर....

PM Kisan Yojana 20th installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात. ही रक्कम वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन-दोन हजारांनुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केली जाते. आता लवकरच पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता मिळणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. याद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत. आता 20 वा हप्ता कधी खात्यात येणार याचीच प्रतिक्षा गरजू शेतकऱ्यांना आहे.

PM Kisan Yojana 20th installment

भारतीय शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे आणि जीरायती शेती करणाऱ्या अल्पभुधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न किती होणार हे पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर आजही अवलंबून आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांसाठी भरपाई आणि शेतकऱ्यांचे उत्थान या दृष्टीने पीएम किसान सन्मान निधी वितरीत केला जातो.

दर चार महिन्याला बँक खात्यात जमा होतो हप्ता

सांगायचे झाले तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दर चार महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या स्वरुपात प्राप्त होतो. हा हप्ता बँकेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो आणि एसएमएस किंवा इतर साधनांद्वारे ही रक्कम खात्यात आली की, नाही हे जाणून घेता येते.

कधी येणार पीएम किसानचा 20 वा हप्ता?

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जारी करण्यात आला होता. यानंतर आता चार महिने सरले आहेत, त्यामुळे विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील. यासंदर्भात अधिकृतरित्या घोषणा झाली नाही पण लवकरच यासंदर्भात घोषणा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जून महिन्यात पीएम किसान योजनेचे पैसे मिळू शकतात.

पीएम किसान योजनेविषयी थोडक्यात..

पीएम किसान सन्मान निधी अशी योजना आहे ज्यामध्ये एक वर्षातील दर चार महिन्याला दोन -दोन हजारांची रक्कम तीन टप्प्यात एकूण 6 हजार रुपये शेतकऱ्यांना वितरीत केले जातात. ही योजना फक्त पात्र लाभार्थ्यी शेतकऱ्यांसाठीच आहे. यंदा विसाव्या हप्त्यात दोन हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे जे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केले जातील.

दोन हजारांचा हप्ता हवा मग ई-केवायसी केली का?

जर तुम्हाला पीएम किसानचा लाभ हवा असेल आणि दर चार महिन्याला विनाअडथळा खात्यात पैसे यावे असे वाटत असेल तर तुम्हाला आधी जमीन पडताळणी, जमीनीची माहिती, ई-केवायसी करावी लागेल आणि तिसरे सर्वात महत्वाचे काम म्हणजे तुमच्या 'आधार'ला मोबाईल क्रमांक लिंक करावा लागेल. जर तो नसेल तर तुम्हाला पैसे मिळण्यास अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे काम लवकर करायला हवे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+