PM kisan : पीएम किसानचा 21 वा हप्ता जमा झाला नाही? 'या' हेल्पलाईनवर कॉल करा, मिनिटांत नोंदवा तक्रार
PM kisan 21st installment helpline e kyc status : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता नुकताच जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमातून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली. तरीही, तुम्ही योजनेसाठी पात्र असूनही तुमच्या खात्यात ₹2,000 चा हप्ता जमा झाला नसेल, तर काळजी करू नका! तुमचा स्टेटस तातडीने तपासा आणि त्यानंतर सरकारने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मिनिटांत तुमची तक्रार नोंदवा.

हप्ता न मिळण्याची प्रमुख कारणे
पात्र शेतकऱ्यांचे पैसे थांबण्याचे सर्वात मोठे आणि सामान्य कारण म्हणजे ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण असणे हे होय. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही त्यांच्या खात्याचे ई-केवायसी पूर्ण केलेले नाही. यामुळे सरकारकडून पैसे थांबवले जातात. जर तुमचे ई-केवायसी झाले नसेल, तर ते त्वरित पूर्ण करा. ई-केवायसी पूर्ण होताच, पुढील हप्त्यासोबत मागील थकीत हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा केला जाईल.
PM किसान स्टेटस कसा तपासायचा?
- तुमचा हप्ता का थांबला आहे, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया करा.
- सर्वप्रथम PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in येथे भेट द्या.
- होमपेजवर 'Beneficiary Status' (लाभार्थी स्थिती) या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा नोंदणीकृत खाते क्रमांक यापैकी कोणताही एक तपशील भरा.
- 'Get Data' वर क्लिक करा.
- येथे तुम्हाला तुमचा हप्ता का थांबला आहे आणि तुमचे नाव लाभार्थींच्या यादीत आहे की नाही, याची सविस्तर माहिती मिळेल.
तक्रार नोंदवण्यासाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक
- तुम्ही पात्र असूनही हप्ता मिळाला नसल्यास, तातडीने तक्रार नोंदवण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:
- संपर्क पर्याय तपशील
- हेल्पलाईन नंबर 011-24300606 आणि 155261
- टोल-फ्री नंबर 1800-115-526
- ईमेल आयडी [email protected] आणि [email protected]
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता निश्चितपणे दिला जाईल. त्यामुळे नियमितपणे आपला स्टेटस तपासा आणि गरजेनुसार हेल्पलाईनशी संपर्क साधा.
साभार - गुडरिटर्न्स
हेही वाचा : PM Kisan Yojana पीएम किसानचा तुमचा 21 वा हप्ता खात्यात जमा झाला की नाही? ३ सोप्या बाबीतून जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications