Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आनंदाची बातमी ! पीएम धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

केंद्रीय कॅबिनेटने पीएम धन धान्य कृषी योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे, ज्यामुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी दरवर्षी 24 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यामध्ये सध्याच्या 36 विविध कृषी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती आणि आता केंद्र सरकारने 2005 पासून पुढील 6 वर्षांसाठी या योजनेस मंजुरी दिली आहे.

PM Dhan Dhanya Krishi Yojana

योजनेचा उद्देश आणि व्याप्ती

पीएम धन धान्य कृषी योजनेचा मुख्य उद्देश देशातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. यात पिकांच्या कापणीनंतरची साठवण क्षमता वाढवणे, पेरणीच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे यावर भर दिला जाईल.

या योजनेअंतर्गत देशभरातील 100 जिल्ह्यांची निवड केली जाईल, ज्यांची सध्याची कृषी उत्पादकता कमी आहे. या जिल्ह्यांमध्ये शेतीच्या विकासासाठी चालू असलेल्या 36 योजनांना एकत्र करून प्रभावीपणे राबवले जाईल. ही योजना राज्य सरकारच्या सहकार्याने कार्यान्वित केली जाईल, ज्यामुळे केंद्र आणि राज्याच्या समन्वयातून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणता येईल.

शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ?

  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे:
  • आर्थिक सहाय्य: शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली विविध अवजारे, बी-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत पुरवली जाईल. तसेच ट्रॅक्टर, कृषी पंप यांसारख्या उपकरणांसाठीही अर्थसहाय्य मिळेल.
  • तंत्रज्ञानाचा वापर: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल, ज्यामुळे उत्पादन आणि कार्यक्षमता वाढेल.
  • पायाभूत सुविधा विकास: पिकांची साठवणूक आणि सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. पंचायत आणि ब्लॉक स्तरावर कार्यक्षम साठवणूक आणि गोदाम व्यवस्था विकसित केली जाईल, ज्यामुळे काढणीपश्चात होणारे नुकसान कमी होईल.
  • उच्च दर्जाचे निविष्ठा: शेतकऱ्यांना उच्च गुणवत्ता असलेले बी-बियाणे आणि खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित केला जाईल.
  • रोजगार निर्मिती: कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर दिला जाईल, विशेषतः ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
  • हवामान-प्रतिरोधक शेती: उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान-विशिष्ट शेती, पाण्याची कार्यक्षमता आणि अचूक शेतीचा अवलंब करण्यास प्रेरणा दिली जाईल.

या योजनेमुळे आगामी काळात भारतीय शेतीत मोठे बदल घडण्याची आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याची अपेक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+