काय आहे पियुष गोयल यांच्या वक्तव्याचा वाद? त्यांनी स्टार्टअपवर उपस्थित केलेले प्रश्न नेमके काय आहेत?
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्टार्टअप महाकुंभ- २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. या कार्यक्रमात मंत्री गोयल यांनी भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमवर एक भाष्य केले. त्यांच्या या विधानानंतर चांगलाच वाद रंगला. झेप्टोचे सीईओ आदित पलिचा यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या बचावासाठी पुढाकार घेतला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लांब पोस्ट पोस्ट केली आणि सरकारला प्रश्नही विचारले.

काय म्हणाले होते गोयल?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्टार्टअप महाकुंभ २०२५ मध्ये भारत आणि चीनमधील स्टार्टअप परिस्थितीची तुलना केली. ते म्हणाले की, भारतीय स्टार्टअप्सना ते काय करत आहेत हे माहित असणे आवश्यक आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत खरोखर मूल्य वाढवणाऱ्या उद्योगांवर आपण लक्ष केंद्रित करायला हवे. आपण स्पर्धेपासून दूर जाऊ नये, तर नवोपक्रम आणि दीर्घकालीन शाश्वततेसाठी काम करावे. आपल्याला जागतिक पातळीवर जाऊन मोठा विचार करायला हवा. जेव्हा आपण सखोल तंत्रज्ञानाकडे पाहतो तेव्हा इकोसिस्टममध्ये फक्त एक हजार स्टार्टअप्स आहेत आणि ते चिंताजनक आहे. कमी वेळात पैसे कमवण्याऐवजी, स्टार्टअप्सनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
नवउद्योजकांनी घेतला आक्षेप
स्टार्टअप्सवर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की, बेरोजगार तरुणांना स्वस्त मजुरांकडे ढकलले जात आहे. जेणेकरून श्रीमंत लोकांना घरी बसून अन्न मिळू शकेल. यासोबतच त्यांनी असेही म्हटले की भारताने आतापर्यंत जे काही केले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आम्ही अद्याप सर्वोत्तम झालो नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर, भारतातील उद्योजकांनी आपला आक्षेप व्यक्त केला.
काय म्हणाले आदित पलीचा?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या वक्तव्यानंतर, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टोचे सीईओ आदित पलिचा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, भारतीय ग्राहक इंटरनेट स्टार्टअप्सवर टीका करणे खूप सोपे आहे. अमेरिका आणि चीनमध्ये विकसित होत असलेल्या सखोल तांत्रिक उत्कृष्टतेशी आपली तुलना करणे सोपे आहे. पण वास्तव असे आहे की आज सुमारे १.५ लाख लोक झेप्टोद्वारे कमाई करत आहेत.
दरवर्षी १ हजार कोटींचा कर
आदित पुलिचा म्हणाले की, झेप्टो ही अशी कंपनी आहे जी ३.५ वर्षांपूर्वी अस्तित्वातही नव्हती. दरवर्षी सरकारला १,००० कोटी रुपयांहून अधिक कर देणे, एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त थेट परदेशी गुंतवणूक आणणे, भारताच्या बॅकएंड पुरवठा साखळ्यांचे आयोजन करण्यासाठी शेकडो कोटींची गुंतवणूक करणे, जर हा भारतीय नवोपक्रमाचा चमत्कार नसेल तर मला प्रामाणिकपणे माहित नाही की ते काय आहे.
काय आहेत प्रश्न?
या पोस्टमध्ये आदित पुलिचा यांनी काही प्रश्नही विचारले आहेत. ते म्हणाले की, भारताकडे स्वतःचे मोठे एआय मॉडेल का नाही? भारतात अद्याप चांगल्या इंटरनेट कंपन्या स्थापन झालेल्या नाहीत म्हणून असे झाले आहे. अमेझॉन, फेसबुक, गुगल आणि अलिबाबा सारख्या कंपन्यांबद्दल ते म्हणाले की, या सर्व मोठ्या कंपन्या एकेकाळी ग्राहक इंटरनेट कंपन्या म्हणून सुरू झाल्या होत्या. त्या आता मोठ्या एआय कंपन्या आहेत. भारत सरकार आणि भारतातील मोठ्या गुंतवणूकदारांनी स्टार्टअप इकोसिस्टमसोबत एकत्र काम करण्याऱ्या संघांना थांबवू नये.












Click it and Unblock the Notifications