Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेतकऱ्यांचे आंदोलन पोहोचले थेट सर्वोच्च न्यायालयात, पहा नेमकं काय घडलंय

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन आता थेट कोर्टात पोहोचले आहे. सरकारने शंभू सीमेसह इतर सर्व सीमा खुल्या कराव्यात अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाने आज जरा हिंसक वळण घेतले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. आता उद्या या याचिकेवर काय निर्णय होतो, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Farmers  Movement

उद्या शेतकऱ्यांची बैठक

उद्या म्हणजेच सोमवारी संयुक्त किसान मोर्चा व किसान मजदूर मोर्चाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढच्या आंदोलनाची रुपरेषा ठरविली जाणार आहे. पंजाबचे शेतकरी नेते सर्वन सिंग पंधेर यांनी आज सिंधू सिमेवरुन शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या बळजबरीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, किमान नऊ शेतकरी जखमी झाले. त्यातील गंभीर जखमीला चंडीगडला घेऊन गेले आहेत. आंदोलनकर्त्यांना परत येण्याची विनंतीही त्यांनी केली.

शुक्रवारपासून सुरु आहे धुमश्चक्री

शुक्रवारी दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना अडविण्यात आले. त्यानंतर त्यातील १०१ शेतकऱ्यांनी रविवारी पुन्हा दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न केला. पंजाबच्या सीमेवर हरियाणाच्या सुरक्षा जवानांनी या आंदोलकांना अडवले. त्यानंतर वाद वाढल्यानंतर अश्रुधुराचे नळकांडे आणि पाण्याच्या तोफांचा मारा करण्यात आला. या प्रकारात नऊ शेतकरी जखमी झाले. या प्रकारानंतर दिल्लीकडे जाणारा मोर्चेा तात्पुरता रद्द करण्यात आला. उद्या पुन्हा बैठक होणार आहे.

सीमा खुल्या करण्यासाठी याचिका

दरम्यान, पंजाबचे रहिवाशी असलेल्या गौरव लुथरा यांनी सर्वोच्च न्यायालयात पोलिसांनी अडविलेल्या सीमा खुल्या करण्याबाबत याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, पंजाब सरकार व हरियाणा सरकारने बंद केलेल्या सर्व राज्यांच्या सीमा खुल्या करण्याचे आदेश द्यावेत, असे या याचिकेत म्हटले आहे. सीमा बंद करुन सरकार त्यांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहेत, असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे. आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+