नरवणेंच्या पुस्तकात असं काय? ज्यामुळे राहुल गांधी म्हणाले-पंतप्रधानांची सभागृहात येण्याची हिंमत नाही

Parliament Today 4 Key Points on Rahul Gandhi vs PM Modi Clash : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसद परिसरात माजी भूदल प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "जेव्हा चीनचे टँक भारतीय सीमेपर्यंत (कैलाश रिझ) पोहोचले होते, तेव्हा पंतप्रधान आणि संपूर्ण सरकारने लष्कराला वाऱ्यावर सोडले होते," असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

Parliament Today 4 Key Points on Rahul Gandhi vs PM Modi

'पंतप्रधानांनी स्वतःची जबाबदारी झटकली'- राहूल गांधी

हातात जनरल नरवणेंचे पुस्तक घेऊन माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, "मला वाटत नाही की आज पंतप्रधानांमध्ये लोकसभेत येण्याची ताकद आहे. जर ते आले, तर मी स्वतः जाऊन त्यांना हे पुस्तक भेट देईन. देशाच्या प्रत्येक तरुणाला या पुस्तकात काय लिहिले आहे, हे समजले पाहिजे."

जनरल नरवणेंनी कोणाला फोन केला होता?

राहुल गांधी यांनी पुस्तकातील एका प्रसंगाचा उल्लेख करत गंभीर आरोप केले यात त्यांनी आणीबाणीच्या प्रसंगी राजनाथ सिंह यांना काॅल केला होता व आणखी काही उल्लेख केला. त्यानुसार, "जेव्हा चिनी टँक कैलाश रिझजवळ आले, तेव्हा जनरल नरवणेंनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन करून पुढील आदेशाबद्दल विचारले. पण त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. जनरल नरवणे यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशीही संपर्क साधला, पण तिथूनही प्रतिसाद मिळाला नाही.

'टॉप' कडून काय आदेश आला?

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा नरवणेंनी पुन्हा राजनाथ सिंहांच्या संपर्क साधला, तेव्हा त्यांनी 'टॉप' (पंतप्रधान) ला विचारून सांगतो असे म्हटले. शेवटी आदेश आला की, "चिनी सैन्य आत आले तरी परवानगीशिवाय गोळीबार करू नका," तर दुसरीकडे लष्कर मात्र प्रत्युत्तर देण्यास तयार होते, असा गौप्यस्फोट राहूल गांधी यांनी केला आहे.

जनरल नरवनेंनी स्वतःला एकटे समजले, राहूल गांधींचा दावा

राहुल गांधींच्या मते, पुस्तकात नरवणेंनी लिहिले आहे की, "त्या अत्यंत कठीण प्रसंगात मला पूर्णपणे एकटे पाडल्यासारखे वाटले. संपूर्ण शासनाने (Establishment) मला वाऱ्यावर सोडले होते." पंतप्रधानांनी लष्करप्रमुखांना 'तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा' असे सांगून आपली जबाबदारी झटकली, असा आरोपही राहुल गांधींनी केला.

संसदेत आज काय घडले? हे आहेत ४ प्रमुख मुद्दे

१. जनरल नरवणेंच्या पुस्तकावरून वाद

राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी सरकारने लष्कराला एकाकी सोडल्याचा आरोप त्यांनी केला.

२. पंतप्रधानांवर निशाणा

राहुल गांधींनी हातात पुस्तक घेऊन "पंतप्रधानांमध्ये सभागृहात येण्याची हिंमत नाही" असे विधान केले, ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

३. चीन सीमावादावर स्पष्टीकरणाची मागणी

विरोधकांनी सीमा प्रश्नावर सविस्तर चर्चेची मागणी करत संसदेत घोषणाबाजी केली. लष्करप्रमुखांनी सरकारला केलेल्या फोन कॉल्सना प्रतिसाद का मिळाला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

४. अर्थसंकल्पावर चर्चा

जनरल नरवणेंच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे अर्थसंकल्पावरील नियमित चर्चेत वारंवार अडथळे आले. सत्ताधारी पक्षाने राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचे सांगून ते फेटाळून लावले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+