Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ओम बिर्लांच्या आणीबाणीवरील विधानावरून सभागृहात प्रचंड गदारोळ, बिर्ला म्हणाले...

नवी दिल्ली: ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. आवाजी मतदानाने त्यांची सभागृहाचे पीठासीन अधिकारी म्हणून निवड झाली. यानंतर सर्व नेत्यांनी ओम बिर्ला यांची सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांनी आणीबाणीच्या कालखंडाची आठवण करून देत हा देशाचा काळा दिवस असल्याचे विधान केले. आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ओम बिर्ला म्हणाले की, हे सभागृह 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध करते.

om birla statement on emergency

ओम बिर्ला यांच्या या विधानामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी सभागृहात गदारोळ सुरू केला. मात्र त्यानंतरही ओम बिर्ला आणीबाणीवर बोलत राहिले. ओम बिर्ला म्हणाले की, ज्यांनी आणीबाणीला कडाडून विरोध केला आणि अभूतपूर्व लढा दिला त्या सर्वांच्या निर्धाराचे आम्ही कौतुक करतो.

२५ जून १९७५ चा दिवस इतिहासातील काळा अध्याय

पुढे ते म्हणाले, भारताच्या लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. 25 जून 1975 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखला जाईल. त्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या राज्यघटनेवर आघात केला होता. लोकशाहीची जननी म्हणून भारताची जगभरात ओळख आहे.

भारताने नेहमीच लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि प्रोत्साहन दिले आहे, अशा प्रकारे इंदिरा गांधींनी भारतावर हुकूमशाही लादली, भारतातील लोकशाही मूल्ये ठेचली गेली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला. आणीबाणीच्या काळात भारतातील नागरिकांचे हक्क नष्ट झाले. नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले.

विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा हा काळ होता. संपूर्ण देश तुरुंगात बदलला होता. तत्कालीन हुकूमशाही सरकारने माध्यमांवर अनेक निर्बंध लादले. न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा आली. आणीबाणीचा तो काळ आपल्या देशाच्या इतिहासातील अन्यायाचा काळोख होता.

ओम बिर्ला म्हणाले की, या महान सभागृहाचा पीठासीन अधिकारी म्हणून मला पुन्हा एकदा माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान आणि सर्व पक्षांचे नेते आणि खासदार यांचा आभारी आहे.

ही 18वी लोकसभा म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आहे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्विघ्न आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो. दरम्यान, विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+