महायुती सरकारच्या निर्णयापेक्षा मोठा निर्णय! 'या' राज्यात घरगुती ग्राहकांना 125 युनीटपर्यंत मोफत वीज
Nitish Kumar announces free electricity up to 125 units : महाराष्ट्रातील महायुती सरकारने वीजदरात कपातीचा निर्णय घेतला. 25 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती, आता या निर्णयापेक्षाही मोठा निर्णय बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या पक्षाच्या सरकारने घेतला आहे. तिथे आता घरगुती वीज ग्राहकांना 125 युनीटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.

महाराष्ट्रात जसा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना आणली गेली अगदी तोच कित्ता आता बिहारमध्येही नितीश कुमार यांचा सत्ताधारी पक्ष गिरवत असून त्यांनी 125 युनीटपर्यंत वीजदरच मोफत करुन टाकले आहेत. आगामी बिहार निवडणुकीच्या धर्तीवर नितीशकुमार यांनी ही घोषणा केली असल्याचे म्हटले जात आहे. एक्सवर आज नितीश कुमार यांनी मोफत विजेसंदर्भात एक पोस्ट केली आहे. एनआयनेही नितीश कुमार यांच्या वीजदराच्या घोषणेबाबत वृत्त दिले आहे.
हमलोग शुरू से ही सस्ती दरों पर सभी को बिजली उपलब्ध करा रहे हैं। अब हमने तय कर दिया है कि 1 अगस्त, 2025 से यानी जुलाई माह के बिल से ही राज्य के सभी घरेलू उपभोक्ताओं को 125 यूनिट तक बिजली का कोई पैसा नहीं देना पड़ेगा। इससे राज्य के कुल 1 करोड़ 67 लाख परिवारों को लाभ होगा। हमने यह…
— Nitish Kumar (@NitishKumar) July 17, 2025
काय आहे नितीश कुमार यांची पोस्ट?
नितीश कुमार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, "आम्ही सुरुवातीपासूनच सर्वांना परवडणाऱ्या दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की 1 ऑगस्ट 2025 पासून, म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलातून, राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना 125 युनिटपर्यंतच्या विजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. याचा फायदा राज्यातील एकूण 1 कोटी 67 लाख कुटुंबांना होईल. आम्ही असेही ठरवले आहे की पुढील तीन वर्षांत, या सर्व घरगुती ग्राहकांची संमती घेतल्यानंतर, त्यांच्या घराच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून लाभ दिला जाईल."
नितीश कुमार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, "कुटीर ज्योती योजनेअंतर्गत, अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल आणि उर्वरित खर्चासाठी सरकार योग्य मदत देखील करेल. यासह, घरगुती ग्राहकांना आता 125 युनिटपर्यंत वीज खर्च करावी लागणार नाही, तसेच एका अंदाजानुसार, पुढील तीन वर्षांत राज्यात 10 हजार मेगावॅटपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होईल."
काय होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गेल्या महिन्यात वीजदराबाबत पोस्ट केली होती ती अशी...
Good news on electricity tariffs!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 25, 2025
For the first time in the State’s history, electricity tariffs will be reduced — starting with a 10% cut in the first year, and a total 26% reduction in phases over the next 5 years.
Thanks to the Maharashtra Electricity Regulatory Commission…
"वीजदरांबाबत आनंदाची बातमी!"
"राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच, वीजदर कमी केले जातील - पहिल्या वर्षी 10 % कपात करून सुरुवात होईल आणि पुढील 5 वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण 26 % कपात केली जाईल. वीजदर कमी करण्याच्या महावितरणच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याबद्दल महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे (MERC) आभार, असा निर्णय यापूर्वी कधीही घेतला गेला नव्हता.पूर्वी, वीजदरात सुमारे 10% वाढ करण्यासाठी याचिका दाखल केल्या जात होत्या, परंतु यावेळी, वीजदर कमी करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली - ज्यामुळे घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना फायदा होईल. राज्यातील जवळजवळ 70% ग्राहक 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात आणि त्यांना 10 % वीजदर कपातीचा सर्वाधिक फायदा होईल."
"आपल्या शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजदरात विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 वर काम वेगाने सुरू आहे. आमच्या वीज खरेदी करारांमध्ये अक्षय ऊर्जेवर वाढत्या लक्ष केंद्रित केल्याने, खरेदी खर्चात भविष्यात बचत केल्याने परवडणारे दर टिकवून ठेवण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील नागरिकांसोबत हा लोककेंद्रित निर्णय शेअर करताना खूप समाधान मिळते."












Click it and Unblock the Notifications