आता टोल नाक्यावर होणार नाही वाहनांची गर्दी; अवघ्या 15 दिवसांत सॅटेलाईटद्वारे टोल वसूल केला जाणार!

Nitin Gadkari announce new toll system in India toll plaza policy : सुरळीत प्रवास आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या वतीने मोठे पाऊल उचलले जात आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

आता टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाही. टोल नाक्यावर आता सॅटेलाईट द्वारे टोल रक्कम वसूल केली जाणार आहे. जीपीएस प्रणालीद्वारे हे सर्व केले जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्र्यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले.

nitin gadkari

काय म्हणाले नितीन गडकरी?

नितीन गडकरी म्हणाले की, पुढील 15 दिवसांत देशभरात एक नवीन उपग्रह-आधारित टोल वसुली धोरण सुरू केले जाईल. या प्रणाली अंतर्गत, वाहनांना आता टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याऐवजी, प्रगत ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रह इमेजिंगच्या आधारे टोल शुल्क आपोआप कापले जाईल.

या प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे?

या मुख्य उद्देश हा लांबच्या लांब लागणाऱ्या रांगा बंद करणे. इंधन वाचवणे आणि राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवासाचा वेळ कमी करणे हा आहे. गडकरी म्हणाले की, नवीन धोरण भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. वाहनांचा मागोवा उपग्रहाद्वारे घेतला जाईल आणि वाहनाशी जोडलेल्या बँक खात्यातून थेट टोल कापला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन प्रणालीमुळे काय फायदा होणार?

या नवीन टोल प्रणाली लागू झाल्यानंतर लोकांना टोल करात सवलत मिळू शकते, असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. प्रवाशांवरील आर्थिक भार कमी होईल, जो बऱ्याच काळापासून एक मोठी चिंता आहे. यापूर्वीही त्यांनी गेल्या महिन्यात संसदेत या टोल धोरणाचा उल्लेख केला होता. आणि सरकारला ही प्रणाली अधिक वापरकर्ता-अनुकूल बनवायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील रस्ते पायाभूत सुविधा मजबूत राहतील याचीही त्यांना खात्री करायची आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+