'गोळ्या झाडल्या तर इकडूनही गोळे टाकले जातील', Operation Sindoor थांबले नाही; भारताचा पाकला इशारा
India Pakistan Ceasefire (Operation Sindoor) : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. आज रविवारी (11 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए, सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत सुमारे दोन तास बैठक घेतली. या बैठकीत पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनावर चर्चा झाली. या बैठकीनंतर, सूत्रांकडून बातम्या आल्या की भारताचे "ऑपरेशन सिंदूर" अजूनही सुरू आहे. जशास तसे उत्तर दिले जातील, असाही निर्धार करण्यात आलेला असून भारताने थेट पाकिस्तानला देखील तसा इशारा दिला आहे.

एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, "जर तिकडून अर्थात पाकड्यांकडून गोळी झाडल्या गेल्या तर येथूनही गोळ्या झाडल्या जातील, वेळप्रसंगी गोळे झाडले जातील. त्यांनी आमच्या हवाई तळांवर केलेले हल्ले हे एक महत्त्वाचे वळण होते. भारताने पाकिस्तानला कडक शब्दात स्पष्ट संदेश दिला आहे. यापुढे जर असेच सुरू राहिले तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल.
Operation Sindoor is not over; if they fire, we will fire, and if they attack, we will attack: Sources pic.twitter.com/jrn8WZ2Vuq
— ANI (@ANI) May 11, 2025
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही संपलेले नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की, "ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. जर त्यांनी (पाकिस्तान) गोळ्या झाडल्या तर आम्हीही गोळ्या झाडू, जर त्यांनी हल्ला केला तर आम्हीही हल्ला करू." बैठकीत पंतप्रधान मोदींनी असेही म्हटले की, 'आपण एका नवीन परिस्थितीत आहोत, जगाला ते स्वीकारावे लागेल. पाकिस्तानला ते स्वीकारावे लागेल, ते नेहमीप्रमाणे चालू शकणार नाही.
We have a very clear position on Kashmir, there is only one matter left- the return of Pakistan-Occupied Kashmir (PoK). There is nothing else to talk. If they talk about handing over terrorists, we can talk. We don't have any intention of any other topic. We don't want anyone to… pic.twitter.com/QWrmbFuK8y
— ANI (@ANI) May 11, 2025
काश्मीरबाबत कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत असे सांगण्यात आले की 'काश्मीरबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, आता फक्त एकच मुद्दा उरला आहे - पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत करणे. याशिवाय दुसरे काहीही नाही. जर ते दहशतवाद्यांना ताब्यात देण्याबद्दल बोलत असतील तर आपण बोलू शकतो. माझा इतर कोणत्याही विषयावर बोलण्याचा हेतू नाही. आम्हाला कोणीही मध्यस्थी करू इच्छित नाही. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, अशीही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना स्पष्टपणे सांगितले की, जर पाकिस्तानने काही केले तर त्याचे उत्तर आणखी विनाशकारी आणि कठोर असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच रात्री पाकिस्तानने 26 ठिकाणी हल्ला केला आणि भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला झाला.
The situation worsened for Pakistan in every round; they lost to India in every round of the battle. After our strikes on Pakistan air bases, Pakistan has realised they are not in this league. A clear message was given by India, no one is safe, it is the new normal: Sources https://t.co/x516pQ7mzl
— ANI (@ANI) May 11, 2025
'भारत-पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व परराष्ट्र मंत्र्यांमध्ये संवाद नाही'
भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कोणताही संवाद झालेला नसल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे. ही चर्चा फक्त दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये (DGMO) झाली.
बैठकीत असे सांगण्यात आले की, 'जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर (पाकिस्तान) येथील मुख्यालयाचे सर्वात जास्त नुकसान झाले, सर्वात शक्तिशाली शस्त्रे वापरली गेली. जैश-ए-मोहम्मदची निर्मिती आयएसआयने केली होती, हा भारताकडून एक महत्त्वाचा संदेश होता. त्याला उद्धवस्त करण्यात आलेले आहे.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य











Click it and Unblock the Notifications