पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्या ७ बैठका; १०० दिवसांचा आढावा
Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कार्याकुशलतेसाठी ओळखले जातात. सातत्याने काम करत राहण्याचा त्यांचा खाक्या भारतीयांच्या कौतुकाचा विषय आहे. सात टप्प्यात झालेली निवडणूक, त्यासाठी देशभर दौरे, मुलाखती, प्रचार, राजकीय चर्चा, वाटाघाटी आणि कन्याकुमारी येथे केलेली ध्यान धारणा पूर्ण झाल्यानंतर मोदी पुन्हा नव्या दमाने झपाटून कामाला लागले आहेत.
रविवारी एकाच दिवसात त्यांनी तब्बल ७ बैठका घेतल्या. लोकसभा निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या अजेंड्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेषतः रेमाल या चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला.

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यांच्या दरम्यान रेमाल या चक्रीवादळाने पूर्व भारतातील राज्यांना धडक दिली होती. यात प्रचंड नुकसान झाले. ३ डझन हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. भूस्खालानाच्या अनेक घटना घडल्या. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महापूर आले. त्याबद्दल मोदींनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
संपूर्ण भारतात सध्या उष्माघाताचा कहर सुरु आहे. अनेकांना उध्माघातामुळे प्राण गमवावे लागले आहेत. त्या स्थितीचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. तसेच आगामी पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या संदर्भात चर्चा केली.
झंझावाती प्रचार दौरे
लोकसभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात झंझावाती दौरे केले. त्यांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात दीडपट सभा घेतल्या. मोदींनी 8 एप्रिल रोजी पहिली सभा चंद्रपुरात घेतली होती. त्यानंतर, मुंबईतील शिवाजी पार्क येथील मैदानावर मुंबईच्या 6 उमेदवारांसाठी सांगता सभा घेतली. मोदी यांच्यासमवेत निवडणुकांच्या अनुषंगाने प्रथमच राज ठाकरेंनी स्टेज शेअर केल्याचं दिसून आलं. मुंबईतील शेवटच्या प्रचारसभेसह मोदींनी महाराष्ट्रात निवडणुकांसाठीची 18 वी सभा घेतली. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घेणारे राष्ट्रीय नेते म्हणून मोदींचं नाव अग्रस्थानी आहे.
कन्याकुमारीत ध्यानधारणा
अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर मोदिनी थेट कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद स्मारक येथे ४५ तास ध्यान धारणा केली. अन्नाचे सेवन न करता ते केवळ फळांच्या रसावर होते. विरोधकांनी त्यांच्या या कृतीवर टीका केली होती. तसेच त्यांच्या ध्यान धारणेचे थेट प्रक्षेपण करू नये, अशी विनंती आयोगाकडे केली होती.
एक्झिट पोलमध्ये पुन्हा मोदीच
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान संपल्यानंतर निकालांचा अंदाज व्यक्त करणारे एक्झिट पोलचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. त्यात बहुतेक सर्वच संस्थांनी भाजप आघाडीला ३५० च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कॉंग्रेसने मात्र अंदाजांची खिल्ली उडवली असून, कॉंग्रेस आघाडीला २९५ जागा मिळण्याचा दावा केला आहे.












Click it and Unblock the Notifications