Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शिवाजी महाराजांचे नाव वगळून सेंट मेरी यांचे नाव! काय आहे कर्नाटकातील Metro स्टेशनच्या नामकरणाचा वाद?

Nama Metro naming controversy Fadnavis criticizes Congress : कर्नाटकच्या बंगरुळूमधील नम्मा मेट्रो स्थानकाचे नाव बदलून आता ते सेंट मेरी ठेवण्यात येणार आहे. नामकरणाच्या प्रस्तावामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. खासकरुन महाराष्ट्रातून प्रतिक्रीया येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामकरणावर आपली प्रतिक्रीया दिली आहे व कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.

Nama Metro naming controversy Fadnavis criticizes Congress

कर्नाटक काँग्रेस सरकारचा काय आहे प्रस्ताव?

बंगळुरूमध्ये शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव 'सेंट मेरीज' असे ठेवण्याच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळूरुमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव 'सेंट मेरीज' असे ठेवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे.

या प्रस्तावाला भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे.स्थानिक आमदार आणि बंगळूरुच्या बिशपने केलेल्या विनंतीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. सेंट मेरीज बॅसिलिका हे शिवाजीनगर बस डेपो जवळ असल्यामुळे प्रवाशांना सोयीचे होईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

वादाचे कारण काय?

मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीव्र विरोध दर्शवला आहे. भाजपच्या मते, हा निर्णय 'मतपेटीचे राजकारण' आहे. सोशल मीडिया देखील अनेक लोकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक नेटिझन्सनी दिवंगत कन्नड अभिनेते-दिग्दर्शक शंकर नाग यांचे नाव मेट्रो स्टेशनला देण्याची मागणी केली आहे. यंगळी यांनी १९८० च्या दशकात बंगळूरुमध्ये मेट्रोची कल्पना मांडली होती, त्यामुळे त्यांचे नाव देण्याची मागणी अनेकजण करत आहेत.

काय म्हणाले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार?

या वादावर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मेट्रो स्टेशनचे नाव देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात काहीही चुकीचे नाही. आम्ही यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ," असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या नामांतराचा मुद्दा चर्चेत राहणार आहे.

काय म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

कर्नाटकातील शिवाजीनगर रेल्वेस्थानकाचे नामकरण करण्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली, ते म्हणाले की, "कर्नाटक काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मी निषेध करतो.एकप्रकारे शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे काम कर्नाटक सरकारकडून केले आहे. या गोष्टीचे मला दुःख आहे.शिवाजी महाराजाची अपमान करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरु हे पंतप्रधान असण्यापासून आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक जवाहरलाल नेहरुंनी लिहिले, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे मत व्यक्त केले ते आपल्याला माहीतच आहे. सातत्याने काँग्रेसची तीच परंपरा दिसत आहे. इश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्‍यांना सुबुद्धी द्यावी असे फडणवीस यांनी म्हटले आहे." असे चे एबीपी माझाच्या वृत्तात म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+