'वक्फ' कायद्याला विरोध, मुर्शिदाबाद हिंसाचारात बाप-लेकाची हत्या कशी झाली? वाचा हृदयद्रावक कहानी
Murshidabad violence : देशात वक्फ सुधारणा कायदा आता अमलात आला आहे, हे विधेयक जेव्हा परित केले जात होते त्यावेळी त्याला मोठा विरोध झाला. यानंतर मुर्शिदाबादेत वक्फ कायद्याविरोधात आंदोलने झाली आणि यातून हिंसाचार उफाळला.
वक्फ कायद्याच्या नावाखाली झालेल्या आंदोलनामुळे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे उसळलेल्या हिंसाचाराचे अत्यंत भीषण चित्र समोर आले आहे. मुर्शिदाबादमध्ये ज्या प्रकारे दंगलखोरांनी लक्ष्य केले आहे ते अत्यंत भयावह होते, या हिंसाचारात पिता-पुत्राला घराबाहेर ओढून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

वक्फ कायद्याला विरोध म्हणून मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार उसळला, त्यानंतर भाजप आणि स्थानिक पक्षात तिथे राजकारणही रंगले. देशाच्या सुरक्षेसाठी उपाय म्हणून जे करायला हवे ते सोडून राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षांचे नेते एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे राहीले आणि एकमेकांवर चिखलफेक त्यांनी केली. या गोष्टीवरुन जातीवादाला चालना देण्याचाच प्रकार राजकीय पक्षांनी सुरु केला असे आता बोलले जात आहे.
कुणाची झाली हत्या?
मुर्शिदाबादेत हरगोविंद दास आणि चंदन दास यांची हत्या झाली. नात्याने हरगोविंददास पिता तर चंदनदास हे पूत्र होते. मुर्शिदाबाद हिंसाचारात मारले गेलेले हरगोविंद दास आणि त्यांचा मुलगा चंदन दास यांचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओही हिंसाचारानंतर समोर आला आहे.
कधी झाली हत्या?
12 एप्रिल रोजी दुपारी मुर्शिदाबादच्या जाफराबादमध्ये दंगलखोरांनी हरगोविंद दास आणि चंदन दास यांची निर्घृण हत्या केली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यात पिता-पुत्राची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
मुर्शिदाबादमधील जाफराबाद येथील हरगोविंद दास यांच्या घरावर दंगलखोरांच्या जमावाने वक्फच्या नावाने केलेल्या आंदोलनादरम्यान हल्ला केला होता.
कशी झाली हत्या?
दंगलखोरांनी हरगोविंद दास आणि त्यांचा मुलगा चंदन दास यांना सर्वप्रथम घराबाहेर ओढले. त्यानंतर हरगोविंद दास आणि चंदन दास यांची दंगलखोरांनी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. यावेळी काही वादावादी होताना दिसते. दरम्यान
हरगोविंद दास यांचा मृतदेह रस्त्यावर पडलेला दिसतो. तर रस्त्याच्या कडेला चंदन दास गंभीर जखमी आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
किती जणांना अटक झाली अन् आरोपी कोण?
मुर्शिदाबाद हिंसाचारात जवळपास 4 जणांना अटक करण्यात आली आहे. इंडिया टिव्हीने दिलेल्या वृत्तात जियाउल शेख नावाचा व्यक्ती या हत्येचा सूत्रधार असल्याचे नमूद आहे. रविवारी पोलिसांनी त्याला अटकही केली. या प्रकरणी यापूर्वी कालू नाडर, दिलदार आणि इंझमाम यांना अटक करण्यात आली आहे. दिलदारला भारत आणि बांगलादेश सीमेजवळ अटक करण्यात आली हे विशेष...












Click it and Unblock the Notifications