मोदी'खोटारड्यांचे सरदार'; 20 जागा जास्त मिळाल्या असत्या तर BJP वाले जेलमध्ये असते - खरगेंचा निशाणा
Jammu And Kashmir Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे वातावरण तापले आहे. तीन टप्प्यात मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आपले डावपेच आखत आहेत. तर सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी अनंतनागमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला. आज जम्मू-काश्मीरमध्ये सर्वत्र हल्ले होत आहेत, तरीही मोदीजी खोटे बोलायला मागे हटत नाहीत. कारण ते 'खोटारड्यांचे सरदार' आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

20 जागा जास्त असत्या तर हे जेलमध्ये असते
लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत खरगे म्हणाले की, 400 पार वाले कुठे गेले?, भाजप 240 जागांवरच अडकले. आम्हा विरोधकांना आणखी 20 जागा मिळाल्या असत्या तर हे सर्व लोक तुरुंगात असते. हे लोक तुरुंगात जाण्यास पात्र आहेत 'भाजप भाषणे खूप करते, पण कृती आणि शब्दात खूप फरक आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती कमकुवत होणार नाही. संसदेत आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. त्याच ताकदीने आम्ही पुढे जाऊ.
भाजप धर्माच्या नावावर फूट पाडते
कॉंग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले की, अनंतनाग हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. येथे असलेल्या अमरनाथजींच्या गुहेला भेट देण्यासाठी हजारो लोक येतात, कारण ते धार्मिक एकतेचे ठिकाण आहे. आज भाजप इथल्या लोकांमध्ये धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते कधीही यशस्वी होणार नाहीत.
भारत जोडो यात्रेचा विरोधकांना लाभ
खरगे म्हणाले- राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'भारत जोडो यात्रा' काढली होती. या यात्रेत इंडिया आघाडीच्या पक्षांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, ज्याने बऱ्यापैकी यश मिळवले. ते पुढे म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती पाहून भाजप नाराज आहे, त्यामुळे जम्मू-काश्मीरची यादी वारंवार बदलत आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, इंडिया आघाडीची एकजूट पाहून भाजपचे लोक घाबरले आहेत.
खरगे म्हणाले- मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, पण काहीही केले नाही. ते लोकांची दिशाभूल करतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत, तरीही मोदीजी खोटे बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. कारण ते 'खोट्यांचे सरदार' आहेत.
काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची निवडणूकपूर्व युती
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) यांनी निवडणूकपूर्व युती केली आहे. एनसी 52 जागांवर तर काँग्रेसने 31 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्षांनी दोन जागा सोडल्या आहेत, एक खोऱ्यात सीपीआय(एम) आणि दुसरी जम्मू विभागात पँथर्स पार्टीसाठी. जम्मू विभागातील नागरोटा, बनिहाल, डोडा आणि भदेरवाह आणि खोऱ्यातील सोपोर या पाच जागांवर एनसी आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपले उमेदवार उभे करतील, ज्याला युती 'मैत्रीपूर्ण लढत' म्हणत आहे.












Click it and Unblock the Notifications