Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'मोदींचे नाव घेण्यासाठी छळ झाला'; मालेगाव प्रकरणी निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञांचा खळबळजनक खुलासा

Malegaon Bomb Blast Case : 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात नुकत्याच निर्दोष सुटलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत.

तपासणीदरम्यान आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांसारख्या मोठ्या नेत्यांची नावे घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Malegaon bomb blast case

तपास अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप

शनिवारी (2 ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, तपास अधिकारी मला सांगत होते की, जर तुम्ही ही नावे घेतली, तर आम्ही तुम्हाला छळणार नाही. मी नकार दिल्यानंतर त्यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. माझ्या फुफ्फुसाचा पडदा फाटेपर्यंत मला मारत राहिले अखेर मी बेशुद्ध पडले."

त्यांनी पुढे सांगितले की, तपासकर्त्यांना त्यांना खोटे बोलायला लावायचे होते. "मी गुजरातमध्ये राहत होते, म्हणून मला पंतप्रधान मोदींचेही नाव घेण्यास सांगितले गेले. पण मी खोटे बोलण्यास तयार नव्हते.

साध्वी प्रज्ञा यांनी या प्रकरणासाठी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले आहे. "त्यांनी खोटा खटला दाखल करून मला अडकवले," असा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी, "महाराष्ट्रात मालेगावचा खटला दाखल करणाऱ्यांना शिक्षा झाली आहे," असे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले.

मालेगाव बॉम्बस्फोट आणि खटल्याचा निकाल!

29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे एका मशिदीजवळ मोटारसायकलला जोडलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता.

या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि इतर सात जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, अलीकडेच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, 'अभियोजन पक्ष आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरला आहे आणि पुराव्याअभावी सर्व आरोपींना निर्दोष सोडले जात आहे.

निकालावर विविध प्रतिक्रिया!

न्यायालयाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञा यांनी "भगवा, सनातन आणि राष्ट्र जिंकले," असे विधान केले होते, ज्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला. यावर, बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+