Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NIAचे मोठे यश, पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या 2 पाकिस्तान्यांना अटक, पाकचा खोटेपणा उघड

Major success of the NIA in the Pahalgam attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था- एनआयला मोठे यश मिळाले आहे. 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या आणि 16 जणांना गंभीर जखमी करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पहलगाममधील बटकोट येथील परवेझ अहमद जोथर आणि पहलगाममधील हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे आणि ते लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी केली आहे.

Major success of the NIA in the Pahalgam attack

दहशतवाद्यांना परवेज अन् बशीरने दिला होता आश्रय - एनआयए

एनआयएच्या वत्तानुसार, हल्ल्यापूर्वी परवेझ आणि बशीर यांनी जाणूनबुजून तीन सशस्त्र दहशतवाद्यांना हिल पार्क येथील हंगामी ढोक (झोपडी) मध्ये आश्रय दिला होता. या दोघांनी दहशतवाद्यांना अन्न, निवारा आणि रसद पुरवली होती, ज्यांनी त्या भयानक दुपारी धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांची निवडकपणे हत्या केली होती, ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात भयानक दहशतवादी हल्ला बनला.

पहलगामचा हल्ला जगाला हादरवून टाकणारा

एनआयए, ज्याने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या कलम 19 अंतर्गत या दोघांना अटक केली आहे, 22 एप्रिल 2025 रोजी जगाला हादरवून टाकणाऱ्या हल्ल्यानंतर नोंदवलेल्या आरसी-02/2025/एनआयए/जेएमयू प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. तर भारतात मोठा संताप व्यक्त झाला होता. या भ्याड हल्ल्यात अतिरेक्त्यांनी क्रुरतने 26 पर्यटकांना ठार मारले. दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना धर्म विचारून नंतर त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. या प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जाऊ लागली त्यात दहशतवाद्यांच्या क्रुरतेचे एक-एक खुलासे समोर येऊ लागले. त्यात आणखी एका खुलाशाने पुन्हा खळबळ उडाली.

दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांचा मुस्लिम असल्याचा पुरावा पाहिला. ज्यांनी कलमा पढला त्यांच्याबाबत समाधान न झाल्यानंतर या दहशतवाद्यांनी अनेक पर्यटकांना त्यांची पँट काढायला लावली. त्यांची सुंता तपासणी केली. त्यानंतर गोळ्या घातण्यात आल्या अशी माहिती वाचलेल्या पर्यटकांकडून प्राप्त झाली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, हल्ल्याच्या प्रकारानंतर जेव्हा पोलिस व लष्करी पथक घटनास्थळी पोहोचलेले तेव्हा मृतदेहांची तपासणी करण्यात आली. त्यात मृतांपैकी 20 मृतदेहांच्या अंगावरील पँट उघड्या किंवा खाली ओढलेल्या आढळल्या. दहशतवाद्यांनी अनेक लोकांना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांचा धर्म तपासला अन् खतना झाली होती का.. याची पडताळणीही केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+