छत्तीसगडच्या जंगलात सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, वाचा कसे झाले ऑपरेशन
Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना नक्षलविरोधी अभियानात मोठे यश मिळाले आहे. बस्तर विभागातील नक्षलग्रस्त जिल्हा दंतेवाडा येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने तब्बल 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यात नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण मिशनबद्दल बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील अबुझमदच्या थुलथुली गावाच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये 30 नक्षलवादी ठार झाले. विशेष व आनंदाची बाब म्हणजे रक्षा दलाचे सर्व जवान सुरक्षित आहेत.

सुंदरराज म्हणाले की, नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अबुझमद भागात माओवाद्यांचा वावर असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर रायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांमधून जिल्हा राखीव रक्षक आणि विशेष कार्य दलाच्या जवानांची एक तुकडी रवाना करण्यात आली होती.
मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी देखील एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सदर कारवाईची माहिती देत सुरक्ष दलाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. यात नक्षलवाद्यांच्या मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता देखील आहे.
सैनिकांनी मिळवलेले हे मोठे यश कौतुकास्पद आहे. त्याच्या धाडसाला आणि अदम्य साहसाला माझा सलाम. नक्षलवाद संपवण्यासाठी सुरू झालेला आमचा लढा आता शेवट होईपर्यंत संपणार नाही. राज्यातून नक्षलवाद संपवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.महिनाभरापूर्वी
3 महिला नक्षलवादी ठार
29 ऑगस्ट रोजी नारायणपूर आणि कांकेर सीमेवरील अबुझमद भागात चकमक झाली होती. या चकमकीत 3 गणवेशधारी महिला नक्षलवादी ठार झाल्या. उत्तर बस्तर विभाग समिती आणि पीएलजीए कंपनी क्रमांक 05 चे सदस्य म्हणून त्यांची ओळख पटली.
आतापर्यंत 160 हून अधिक नक्षलवादी मारले गेले
2024 मध्ये आतापर्यंत 160 हून अधिक नक्षलवादी चकमकीत मारले गेले आहेत. बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दंतेवाडा चकमकीपूर्वी सांगितले होते की, पावसाळ्यातच बस्तर विभागात 212 हून अधिक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. नक्षलविरोधी अभियानात 201 नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले आहे.












Click it and Unblock the Notifications