Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mahatma jyotiba phule jayanti 2025 : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना आपले गुरू का मानले?

Mahatma jyotiba phule jayanti 2025 : महात्मा ज्योतिबा फुले असे महान आणि क्रांतिकारी समाजसुधारक ज्यांनी वर्णव्यवस्था, अस्पृश्यता, जातीव्यवस्थेसाठी लढा दिला. ते थोर समाजसुधारक होते म्हणूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुलेंचे पुर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.

Mahatma jyotiba phule jayanti 2025

पुण्यात पहिली शाळा काढली

महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. महात्मा फुलेंनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. अस्पृश्य आणि दलित वर्गातील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना 1888 मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" पदवी प्रदान केली होती.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मानायचे महात्मा फुलेंना गुरू

महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. महात्मा फुले यांना डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत होते, ही बाब सर्वश्रूतच आहे पण डाॅ. आंबेडकर हे महात्मा फुलेंना गुरु का मानत होते याचे कारण आज आपण जाणून घेऊया.

महात्मा फुलेंना डाॅ. आंबेडकर गुरु का मानत होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गौतम बुद्ध आणि कबीर यांच्यासह तिसरे गुरु मानले, कारण महात्मा फुले यांनी आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत असलेल्या शूद्र, अतिशुद्र, महिला आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी लढा दिला.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढा दिला,हे प्रेरक कार्य आणि विचार महात्मा फुलेंचे होते जे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरक वाटले आणि त्यांनी महात्मा फुलेंना आपले गुरु मानले.

महात्मा फुलेंविषयी थोडक्यात

  • महात्मा जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी जोतीराव यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला.
  • महात्मा जोतीराव यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
  • शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+