Mahatma Gandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे कोण होता, वाचा
Mahatma Gandhi Jayanti : थोर महापुरुष आणि सत्य अहिंसेचे व्रत आयुष्यभर अंगिकारणाऱ्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेने केली. महात्मा गांधीचा खुनी नथुराम गोडसेला फाशीही झाली. पण हा नथुराम गोडसे कोण होता हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम विनायक गोडसे याचा जन्म मे 1910 मध्ये बारामती (जिल्हा पुणे, महाराष्ट्र ) येथे झाला होता. त्याचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती. त्याने 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्ली येथे महात्मा गांधी यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या.

विकिपीडियात नमूद माहितीनुसार, नथुराम गोडसे हा हिंदू महासभेचा सदस्य होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) माजी सदस्य होता. 1947 च्या भारताच्या फाळणीच्यावेळी गांधींनी ब्रिटिश भारतातील मुस्लिमांच्या राजकीय मागण्यांना अनुकूलता दर्शवली असे त्याचे मत होते. त्याने नारायण आपटे आणि इतर सहा जणांसोबत हत्येचा कट रचला.
गोडसेला अंबाला कारागृहात फाशी
एक वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर, गोडसेला 8 नोव्हेंबर 1949 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गांधींचे दोन पुत्र, मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी क्षमायाचना केल्या होत्या, परंतु त्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांनी फेटाळून लावल्या. गोडसे याला 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
शिक्षण
नथुरामचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. त्याने हायस्कूलचे शिक्षण मध्येच सोडले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण, महाभारत, गीता, पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर अभ्यास केला होता असं म्हटलं जातं.
राजकीय जीवन
विकिपिडियात असंही नमूद आहे की, सुरुवातीला नथुराम गोडसे अखिल भारतीय काँग्रेस या पक्षामध्ये होता. नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शेवटी सन 1930 मध्ये तो अखिल भारतीय हिंदू महासभेत गेला. सुरुवातीला त्याने मोहनदास करमचंद गांधी यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला, पण पुढे गांधींची हिंदूंबरोबरची कथित भेदभावपूर्ण नीती आणि त्यांचे तथाकथित मुस्लिम तुष्टीकरण यांमुळे ते गांधीविरोधी झाले.
गांधी हत्येचा निर्णय
फाळणीचा वेळेस झालेल्या निर्णयानुसार भारताने पाकिस्तानला 75 कोटी रुपये द्यायचे होते. त्यातले 20 कोटी रुपये दिले गेले होते, आणि त्याच वेळेस पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी उरलेले 55 कोटी रुपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय घेतला. पण भारत सरकारचा या निर्णयाच्या विरोधात महात्मा गांधी उपोषणाला बसले. गांधींच्या या निर्णयामुळे नथुराम गोडसे आणि त्यांच्या काही साथीदारांनी गांधी हत्येचा कट रचला.
गांधी हत्येचा पहिला असफल प्रयत्न
गांधींच्या उपोषणामुळे क्षुब्ध झालेला नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांपैकी मदनलाल पाहवा याने गांधींच्या प्रार्थना सभेत जानेवारी 1948 मध्ये बॉम्ब टाकला. त्या वेळेस झालेल्या गोंधळामध्ये गांधींवर पिस्तूल झाडण्याची योजना होती. पण पिस्तूल चालले नाही आणि अंती नथुराम गोडसे आणि बाकी मित्र पळून पुण्यास आले. मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नथुराम गांधींना मारण्यासाठी परत दिल्लीत आला. तेथे पाकिस्तानातून आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांमध्ये फिरताना त्यांनी एकाकडून एक पिस्तूल विकत घेतले होते. त्यानंतर त्याने देशाच्या महापुरुष आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली.
नथुराम गोडसेला मृत्युदंडाची शिक्षा
30 जानेवारी 1948 रोजी, नथुराम गोडसेने बिर्ला हाऊस, नवी दिल्लीच्या मैदानात महात्मा गांधींवर गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना 15 नोव्हेंबर 1949 ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली. महात्म्याची हत्या करणारा नथुराम महात्मा गांधींला संपवू शकला पण त्यांच्या विचाराला संपवू शकला नाही हे आजही म्हटले जाते.












Click it and Unblock the Notifications