'एक हैं तो सेफ हैं' हा नारा जनतेने स्वीकारला, पंतप्रधान मोदींचा भाजप कार्यकर्त्यांशी संवाद
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेरा बूथ सबसे मजबूत' कार्यक्रमांतर्गत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी विजयाचा मंत्र दिला. यावेळी पीएम मोदी म्हणाले, 'मी फक्त एक विचार मांडला की, 'एक हैं तो सेफ हैं' हा नारा महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान पीएम मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितले की, पुढील काही दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कार्यकर्त्यांनी भाजप आणि महायुतीचा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे. केवळ माहीती पत्रिका देऊन औपचारिकता न करता लोकांच्या घरी जाऊन त्यांची मने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मोदी यांनी म्हटलं आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारवर महाराष्ट्रातील जनता खूश असल्याचे मोदी यांनी सांगितलं
पंतप्रधान पुढे म्हणाले की, मी ज्या-ज्याठिकाणी प्रचारला गेलो तिथे मला लोकांचे हे प्रेम दिसले. महायुतीचे सरकार पुढील पाच वर्षे सत्तेवर राहावे अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. मी महाराष्ट्रात प्रचाराला गेलो असता हे आपल्याला महाराष्ट्रभर जाणवलं आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी की म्हणाले, 'ते जातींविरोधात बोलतात, जाती तोडण्याची भाषा करत आहेत.' मोदी म्हणाले की, त्यांना माहित आहे की, एससी एसटी ओबीसी एक आहेत, त्यांची शक्ती खूप जास्त आहे, म्हणून जर त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांचे तुकडे व्हायला हवेत, असे महाविकास आघाडीला वाटते. महायुती सरकार समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या सरकारमध्ये आणि आघाडीच्या सरकारमध्ये हाच फरक आहे. हा फरक लोकांना जाणवत असल्याचं मोदी यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications